Shilpa Raj 5 
मुंबई

'कुंद्राला अखेर कर्माचं फळ मिळालं'; गोल्ड योजनेत सचिन जोशीची झाली होती फसवणूक

सचिन जोशीने २५ मार्च २०१४ रोजी १८ लाख ५७ हजार ८७० रुपये भरले. त्यानंतर सत्ययुग गोल्डने २५ लाख ५० हजार रुपये दंड भरायला सांगितला.

दीनानाथ परब

मुंबई: अश्लील व्हिडिओ प्रकरणात अटक झाल्यामुळे उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या चर्चेत आहे. राज कुंद्राशी जोडलेला हा एकमेव वाद नाहीय. यापूर्वी अन्य वादांमध्येही राज कुंद्राचे नाव आले आहे. दरम्यान अभिनेता सचिन जोशीने (sachin joshi) राज कुंद्रा त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि सत्ययुग गोल्ड विरोधात दीर्घकाळापासून सुरु असलेल्या एका कोर्ट खटल्यात विजय मिळवला आहे. जोशीने तिन्ही पक्षांवर गोल्ड योजनेत फसवणूक केल्याचा आरोप केला होता. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी दोघे सत्ययुग गोल्डमध्ये (Satyug Gold) संचालक होते. (Raj Kundra Shilpa Shetty gold scheme Sachiin Joshi finally gets justice gets possession of gold dmp82)

आता मुंबई उच्च न्यायालयाने सत्ययुग गोल्डला सचिन जोशीला १ किलो सोनं आणि कायदेशीर खटल्याला जो खर्च झाला, त्यासाठी ३ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. "माझ्याप्रमाणे अनेक गुंतवणूकदारांनी सत्ययुग गोल्डमध्ये सवलतीच्या दरात सोनं उपलब्ध आहे, म्हणून गुंतवणूक केली होती. पण ते सोनं कधी मिळालचं नाही. माझा खटला हा प्रातिनिधीक होता" असं सचिन जोशीने म्हटलं आहे.

सचिन जोशीने २५ मार्च २०१४ रोजी १८ लाख ५७ हजार ८७० रुपये भरले. त्यानंतर सत्ययुग गोल्डने २५ लाख ५० हजार रुपये दंड भरायला सांगितला, तरच आधी जी गुंतवणूक केलीय, त्या रक्कमेचं सोनं मिळेल असं सांगितलं. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा दोघांनी सत्ययुग गोल्डचं प्रमोशन केलं होतं. "१८ लाख ५७ हजार ८७० रुपयाच्या सोन्यासाठी मला २५ लाख भरायला सांगितले. मी माझा मेहनतीचा पैसा त्यात गुंतवला होता. कल्पना करा, ज्या सामान्य माणसांनी या सेलिब्रिटींवर भरवसा करुन गुंतवणूक केली, त्यांची काय अवस्था झाली असेल" असे सचिन जोशी म्हणाले. त्यानंतर सचिन जोशीने कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला. सचिन जोशी यांनी यावर्षी १८ जानेवारीला खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. अटकेच्या कारवाईनंतर राज कुंद्राला अखेर त्याच्या कर्माचं फळ मिळालं, अशी भावना सचिन जोशीने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT