Raj Thackeray with bjp
Raj Thackeray with bjp  sakal
मुंबई

Raj Thackeray: मनसेच्या एन्ट्रीने बसणार शिंदे अन् पवारांना फटका? वाचा काय म्हणतायेत राजकीय विश्लेषक

Chinmay Jagtap

MNS Supports BJP: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महायुतीला यंदाच्या लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिला. राज ठाकरे भारतीय जनता पक्षासोबत आल्याने याचा चांगलाच फायदा भाजप आणि महायुतीला होईल यात काही शंका नाही. (Raj Thackeray with Bharatiya Janata Party)

मात्र राज ठाकरेंच्या या निर्णयाचा शिंदेंना आणि अजित पवारांना फटका बसू शकतो , अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर आम्ही राजकीय विश्लेषकांचं मत जाणून घेतलं.

शिवाजी पार्कवरील सभेमध्ये राज ठाकरे नक्की कोणती भूमिका मांडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. यावेळी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. मनसे नेत्यांनी या भूमिकेचं स्वागत केलं तर महायुतीतील घटक पक्षांनी आणि भाजपाने देखील याचं समर्थन केलं. (MNS Raj Thackeray rally Shivaji Park Gudi Padwa)

मात्र याचा थेट परिणाम हा आगामी निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षावर होण्याची शक्यता आहे. विधानसभेमध्ये ज्यावेळेस जागा वाटपाचा विषय येईल तेव्हा दोन्ही पक्षांना याचा फटका बसू शकतो अशी चर्चा आहे. (vidhansabha election 2024 maharashtra)

त्या व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येही असाच काही फटका मनसेमुळे शिंदे पवारांना बसू शकतो, अशी चर्चा आहे. कारण जागावाटपावेळी या दोन्ही पक्षांना आपल्या गोटातून मनसेला काही जागा द्याव्या लागू शकतात.

राजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणाले, ठाकरे यांच्या पाठिंब्याचा शिंदे आणि अजित पवार यांना महायुतीमध्ये फटका बसेल असे वाटत नाही. याचे कारण म्हणजे मनसे आणि शिंदे, पवारांची वोट बँक वेगळी आहे. अजित पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा वर्ग वेगळा आहे. तर शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानगरा वर्ग हा अगदीच वेगळा आहे.

मनसेला १.५ ते २ टक्के मत मिळतात ज्याचा फायदा लोकसभेत महायुतीला होईल. मात्र याचा फटका आगामी काळात शिंदे पवारांना बसेल असं वाटत नाही.

तर दुसरीकडे ठाकरेंनी जर भाजपाच्या विरोधात प्रचार केला असता तर याचा फटका आताच्या लोकसभेमध्ये काही प्रमाणावर महायुतीला बसला असता. यामुळेच मनसेला महायुतीमध्ये सोबत घेतलं असावं असं देखील ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : देशभरात संध्याकाळी पाचपर्यंत ५६.६८ टक्के मतदान; महाराष्ट्रात जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान शिंदे

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT