Raj Thackeray addressing party workers during a strategic meeting, where he instructed MNS leaders not to speak to the media.  sakal
मुंबई

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

Raj Thackeray orders MNS leaders : जाणून घ्या, नेमकं काय म्हटलंय राज ठाकरेंनी; केवळ पदाधिकारी अन् नेत्यांनाच नाहीतर पक्षाच्या प्रवक्त्यांनाही बजावलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Raj Thackeray orders MNS leaders to avoid media statements : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक स्पष्ट आदेश दिला आहे. ज्यामध्ये, त्यांनी कुणीही कोणत्याहीप्रकारच्या मीडियाशी संवाद साधायचा नाही, तसंच स्वत:च्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकयचे नाहीत, असे बजावले आहे.

याबाबत राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणतात, ‘’एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.’’

तसेच ‘’आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय त्यांनी देखील कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.’’ असं राज ठाकरे यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत.

राज्यात मागील काही दिवसांत शालेय विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीच्या मुद्य्यावरून राजकीय वातावरण तापलेलं होतं. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच, या निषेधार्थ मुंबईत मोर्चाचे देखील आयोजन केले होते. मात्र सरकारने तत्पुर्वी निर्णय मागे घेत, भूमिका बदल्याने नियोजित मोर्चा रद्द होवून त्याजागी मराठी विजय मेळावा पार पडला.

यानिमित्त २० वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आले होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका -टिप्पणीही केली. त्यानंतर आता हे दोन्ही पक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणुकी एकत्रच लढवतील, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवाय, मनसैनिकांच्या आणि नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच, हिंदी भाषा वादावरही मनसे नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत, ज्यावरून कधीकधी मनसेची कोंडी होण्याची चिन्हं दिसत आहेत. एकूणच नेत्यांच्या प्रतिक्रियांमुळे पक्षाला फटका बसू नये, या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी स्पष्ट आदेश काढल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

Satara Soldier Martyred: 'साताऱ्यातील जवान देवदास रजपूत यांना वीरमरण'; राजस्थानमधील नासेराबादला सेवा बजावत होते अन् हृदयविकाराचा त्रास

MLA Raju Khare: 'मोहोळचे आमदार राजू खरे मतदार संघातील समस्यांचा निपटारा करण्यासाठी पुन्हा सक्रिय'; प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा

SCROLL FOR NEXT