Raj Thackeray Sakal
मुंबई

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या आदेशानंतर पालिकेने रातोरात आदेश काढले; माहिममधली बांधकाम हटवणार

कालच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी अतिक्रमण न हटवल्यास त्याच्या शेजारी गणपतीचं मंदीर उभारण्याचा इशारा दिला होता.

सकाळ डिजिटल टीम

Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपल्या गुढीपाडवा सभेमध्ये माहिम भागातल्या समुद्रामध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाविषयीची माहिती दिली. तसंच महिन्याभरात हे हटवलं नाही, तर आपण त्या शेजारी गणपती मंदिर बांधू असा इशाराही दिला. त्यानंतर आता लगेचच मुंबई महापालिकेने हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. (Raj Thackeray News)

राज ठाकरेंनी काल जाहीर सभेत व्हिडीओ दाखवत माहिम समुद्राच्या परिसरात होत असलेल्या बांधकामाकडे लक्ष वेधलं. हे बांधकाम जर हटवलं नाही, तर त्याच्या शेजारीच गणपतीचे भव्य मंदिर बांधण्याचा इशाराही दिला. त्यानंतर प्रशासनाने लगेच त्या भागातली सुरक्षा अधिक कडक केली.

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तातडीने चौकशी करण्याचे आदेशही दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी मुंबई महापालिकेने सहा जणांचे पथक नेमले आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून हे अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू केलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या अनधिकृत बांधकामाची मनसे नेते नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे पाहणी करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT