मुंबई

Raj Thackeray: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे लागले कामाला; मनसेचे 'ठाणे-पालघर' फोकस!

Latest Thane News: शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष यांच्या खांद्यावरही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली.

राहुल क्षीरसागरः सकाळ वृत्तसेवा

Latest Thane News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीसह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी युक्त्या लढवल्या जात आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

ठाणे-पालघर जिल्ह्यातील काही जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अशातच ठाणे विधानसभेत मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करून यंदाही या जागेवर आपला विजय निश्चित असल्याचा दावा करत तरुण मतदारांना आपलेसे करण्यासाठी मनसेने आरोग्य कार्डची खेळी खेळत आहे. आतापर्यंत पाच हजार तरुणांना त्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यावर मनसेने आपला फोकस वाढवला आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील २४ मतदारसंघांपैकी सात मतदारसंघांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे, बेलापूर, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि पालघरमधील बोईसर, पालघर या ठिकाणी अधिक फोकस करण्यावर भर देत आहेत.

त्यानुसार पक्ष बांधणी करण्याबरोबर पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. मागील निवडणुकीत ठाण्याचा विचार केल्यास मनसेचे अविनाश जाधव आणि भाजपचे संजय केळकर यांच्यात थेट लढत झाली होती. त्या निवडणुकीत पडलेल्या मतांची गोळाबेरीज करून आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे विधानसभेसाठी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.

त्यानुसार मतदारापर्यंत पोहचण्यासाठी विभागवार बैठका घेतल्या जात आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. यात शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष यांच्या खांद्यावरही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामती, राहुरीत पोटनिवडणुकीची घोषणा, केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा केल्या जाहीर

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Gas Crisis: इंधन संकटाची शक्यता! गॅस वितरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष नियम जारी; प्राधान्य कुणाला? पाहा यादी...

LPG Cylinder Blast: एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, ७ जण जखमी

Latest Marathi Live Update : Jalna: अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुलासोबत उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली

SCROLL FOR NEXT