मुंबई

महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा; परमबीर सिंग यांच्या 'लेटरबॉम्ब'नंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल केलेल्या १०० कोटी रुपयांच्या गौप्यस्फोटानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शैलीमध्ये या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी शनिवारी रात्री ट्विट करत महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटणा असल्याचं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, 'मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.'

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्यात 100 कोटी मिळवण्याचे लक्ष्य दिले होते, असं पत्रात परमबीर सिंह म्हणाले आहेत. त्यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी या पत्रात चॅटही जोडला आहे.  राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यांवर असा आरोप केल्यामुळं राज्य सरकारच्या अडचणी वाढल्यात. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुर्घटनेतून एकटा वाचला, आता घरी एकटाच बसून राहतो, पत्नी-मुलाशीही बोलत नाही; कशी झालीय अवस्था?

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Nagpur News: बहिणीच्या मूळ पेशींमुळे चिमुकलीला मिळाले जीवनदान; रक्ताच्या कर्करोगावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट ठरले यशस्वी

Success Story: एकाच वेळी मामा भाचे झाले क्लासवन अधिकारी; एमपीएससी परीक्षेत शिर्ल्याच्या मामा भाच्यांची दमदार कामगिरी

SCROLL FOR NEXT