Raj Thackeray Slam MVA leaders over Morcha against Adani Group dharavi redevelopment project  
मुंबई

Dharavi Redevelopment Project : 'आजच मोर्चा का? सेटलमेन्टसाठी?' राज ठाकरेंचा मविआ नेत्यांवर घणाघाती आरोप

धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी ग्रुपकडे गेल्यानंतर महाविकास आघाडीकडून त्याविरोधात आंदोलन केलं जात आहे

रोहित कणसे

धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी ग्रुपकडे गेल्यानंतर महाविकास आघाडीकडून त्याविरोधात आंदोलन केलं जात आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली याविरोधात मोर्चा देखील काढण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी अदाणी समूहासह शिंदे सरकारवर हल्लाबोल केला होता.

दरम्यान या सर्व प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिथे नेमकं काय होणार आहे हा प्रश्न विचारला का? की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायची आहे? असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.

एक मोठा प्रकल्प मुंबईत येतोय, तो परस्पर अदानींना का दिला? इथंपासून सुरूवात होते. अदानींकडे असं काय आहे की, ज्यामुळे विमानतळ, कोळसा तेच हताळू शकतात? अनेक कंपन्या आहेत ज्यांच्याकडून तुम्ही टेंडर, डिझाईन मागवून घ्यायला पाहिजे होतं, असेही राज ठाकरे म्हणाले.

या सगळ्याबाबत आमच्या पदाधिकाऱ्यांची बोलणी झाली होती. अदानी ग्रुपकडे डिझाईन दाखवा अशा मागणी देखील केली गेली होती. विषय एवढाच आहे की, महाविकास आघाडीला आज का जाग आली? जाहीर होऊन १० महिने झाले, मग आज का मोर्चा काढला? की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? असा खोचक सवाल देखील राज ठाकरे यांनी यावेळी विचारला

प्रकल्पाला तुमचं समर्थन आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राज ठाकरे म्हणाले की बीडीडी चाळीच्या वेळी देखील मी तेथे गेलो होतो. तिथे एक ओपन स्पेस लागते, तिथं किती शाळा, कॉलेज, रस्ते होणार आहेत याचं डाऊन प्लॅनिंग लागत, असं मी सांगितलं होतं. एक भाग घेतला आणि अदानींना देऊन टाकला असं थोडी असतं.

आठ-दहा महिन्यानंतर जागे झालेल्या महाविकास आघाडीने तिथे नेमकं काय होणार आहे हा प्रश्न विचारला का? की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायची आहे? हे एकदा त्याच लोकांना विचारलं पाहिजे, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT