मुंबई

राज ठाकरे पोहोचलेत लिलावातीमध्ये, ठाकरे कुटुंबियांसाठी भावुक क्षण

सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तरुण नेते  आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे यांना प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. आपल्या मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले चिरंजीव अमित ठाकरे यांची लिलावातीमध्ये जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी लिलावातीमध्ये जाऊन अमित ठाकरे यांची भेट घेणं हा ठाकरे कुटुंबियांसाठी अत्यंत भावुक क्षण होता. 

अमित ठाकरे यांना रविवारी केलंय ऍडमिट : 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमित ठाकरे यांची प्रकृती बिघडल्यामुळे लिलावातीमध्ये  ऍडमिट केलंय. रविवारी रात्री अमित यांना लिलावातीमध्ये दाखल करण्यात आलंय. गेल्या दोन दिवसांपासून अमित ठाकरे यांना ताप येत होता. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता दोन दिवस सारखा ताप येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अमित यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय असं समजतंय. रुग्णालयात दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांनी कोरोना चाचणी देखील करण्यात आली. सुदैवाने अमित यांना कोरोनाची लागण झालेली नाही. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. 

आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिलावातीमध्ये अमित ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांची भेट घेणं हा ठाकरे कुटुंबियांसाठी हा अत्यंत भावुक  क्षण होता.  

raj thackeray went to lilavati hospital to meet his son amit thackeray

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT