Mumbai Sakal
मुंबई

राजाबाई टॉवरची पर्यटकांना आता ‘हेरिटेज सफर’

विद्यापीठ प्रशासन-राज्य पर्यटन विकास विभागात करार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दीडशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मुंबई (Mumbai) विद्यापीठाच्या राजाबाई टॉवर आणि दीक्षान्त सभागृहाची पर्यटकांना सफर करण्याची संधी मिळणार आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने यासाठी मुंबई विद्यापीठ (university) आणि राज्य पर्यटन विकास विभागात करार झाला असून, पुढील आठवड्यापासून देश-विदेशातील पर्यटकांना राजाबाई टॉवरची हेरिटेज सफर करता येणार आहे. पर्यटन विभागाचे संचालक मिलिंद बोरीकर आणि मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

पर्यटकांना प्रत्येक सुटीच्या दिवशी राजाबाई टॉवर आणि दीक्षान्त सभागृह पाहायला मिळणार आहे. यासाठी या पर्यटन सफरीला ‘हेरिटेज वॉक’ असेही नाव दिले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी या पर्यटन सफरीसाठी ‘इंटर्न’ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यासाठी ऑनलाईन बुकिंग ‘टुरिस्ट गाईड असोसिएशन’ या खासगी संस्थेच्या माध्यमातून केली जाणार असून देशातील पर्यटकांना १००; तर विदेशी पर्यटकांना ३०० रुपये इतकी रक्कम यासाठी मोजावी लागणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या या हेरिटेज इमारतीच्या सफारीसंदर्भात राज्य सरकारने विद्यापीठाला या दोन्ही इमारती पर्यटकांसाठी खुल्या कराव्यात, असा प्रस्ताव मागील वर्षी डिसेंबरमध्ये पाठवला होता. त्यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. धनराज कोहचाडे यांनीही मागील अनेक महिन्यांपासून मागणी लावून धरली होती. आता हा करार झाल्याने कोहचाडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

१८६९ मध्ये पायाभरणी

मुंबईतील ख्यातनाम उद्योजक प्रेमचंद रॉयचंद यांच्या आईचे नाव या टॉवरला देण्यात आले आहे. राजाबाई टॉवर वास्तूची पायाभरणी १ मार्च १,८६९ मध्ये झाली. हा टॉवर आणि बाजूला असलेले दीक्षान्त सभागृह या दोन्हीसाठी तब्बल दहा वर्षांचा कालावधी लागला. नोव्हेंबर १,८७९ मध्ये या टॉवरचे बांधकाम पूर्ण झाले. जगविख्यात आर्किटेक्ट सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांच्या कल्पनेतून आणि खास गॉथिक शैलीत हा राजाबाई टॉवर साकारला. त्याची या टॉवरच्या पायात नोंद ही ‘सी. टी. एस. बीएम, एडी १८७७’ अशी दोन ठिकाणी पाषाणावर कोरण्यात आली आहे. हीच खूण विद्यापीठाच्या टॉवरच्या उभारणीची महत्त्वाची खूण आहे.

दृष्टिक्षेप

राजाबाई टॉवर एकूण २८० फूट उंच आहे.

वर माथ्यावर २९० पायऱ्या चढून जावे लागते.

टॉवरची रचना ‘गॉथिक’ शैलीच्या माध्यमातून केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद, स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार?

Navneet Rana: नवनीत राणा यांना बॉम्बने उडविण्याची धमकी; हैदराबादवरून रजिस्टर डाकेने आले पत्र

Solapur News: सोलापुरात आता रात्री २१ ठिकाणी ‘सरप्राईज’ नाकाबंदी; वाहतूक पोलिसही असणार मदतीला; चोरी, दरोड्याच्या घटना रोखण्यासाठी निर्णय

Women's World Cup Team: वर्ल्ड कपच्या सर्वोत्तम संघात हरमनप्रीत कौरला स्थान नाही; भारताच्या तीन खेळाडूंची निवड, कॅप्टन कोण?

फडणवीस बसायला गेले अन् खुर्ची मोडली, व्यासपीठावर उडाला गोंधळ; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT