Worli Hit And Run Esakal
मुंबई

Worli Hit And Run Case: वरळी 'हिट अँड रन' प्रकरणी राजेश शहा यांना जामीन मंजूर; पोलिसांना कोर्टाचा झटका

मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला आहे कारण शहा यांची अटक बेकायदा असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : वरळी 'हिट अँड रन' प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून आरोपी राजेश शहा यांना कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. त्यामुळं मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला आहे. शहा यांची अटक बेकायदा असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. (Rajesh Shah granted bail in Worli hit and run case Court strikes the Police)

शिवसेनेचे उपनेते असलेले राजेश शहा यांना कोर्टानं नुकतीच न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर लगचेच त्यांनी आपली अटक बेकायदा असल्याचं सांगत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कोर्टानं १५,००० रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला.

दरम्यान, या हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला मिहिर शहा हा अद्याप फरार आहे, पण पोलिसांनी त्याचे वडील राजेश शहा यांना अटक केली होती. अटकेनंतर पोलिसांनी त्यांना जेव्हा कोर्टात हजर केला तेव्हा कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राजेश शहा यांनी जामिनासाठी अर्ज केला आणि कोर्टानंही त्यावर बेकायदा अटक असल्याचं सांगत जामिन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT