राणा दाम्पत्याचा मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचा आग्रह धरल्यानं शिवसैनिकांसोबत मोठा संघर्ष झाला होता. त्यामुळं कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेतलं होतं. (फोटो - ट्वीटर) 
मुंबई

राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची पुन्हा नोटीस, कोर्टात दोषारोपपत्र सादर करणार

राणा दाम्पत्यानं हनुमान चालिसा प्रकरणात पोलिसांच्या कामात अडथळा आणला होता.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे. राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. राणा दाम्पत्याविरोधात सत्र न्यायालयात दोषारोपत्र सादर करण्यात येणार आहे. यासाठी ८ जून रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश या नोटिशीतून देण्यात आलं आहे. (Rana couple has issued another notice by Mumbai police chargesheet will be filed soon)

सरकरी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरुद्ध भादंवि कलम ३५३ अन्वये खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस ८ जून रोजी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणार आहेत.

Mumbai Police

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणावर ठाम असल्यानं शिवसैनिकांनी याला विरोध करत राणांच्या घराबाहेर आदोलन केलं होतं. राणा दाम्पत्य आपल्या निर्णयावर ठाम असल्यानं पोलीस त्यांना कायदेशीर नोटीस देण्यासाठी त्यांच्या खार येथील घरी गेले होते. याकामात राणांनी पोलिसांना सहकार्य केले नाही. उलट पोलिसांवर अरेरावी केल्याचा आरोप केला. या प्रकरणी आयपीसीच्या कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Crime : किरकोळ वादातून डोकं दगडानं ठेचलं, बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात १७ वर्षीय तरुणाची हत्या; २ अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

UGC NET 2025 अ‍ॅडमिट कार्ड जाहीर; 31 डिसेंबरच्या परीक्षेसाठी हॉल तिकीट 'असे' करा डाऊनलोड!

SA20: बापरे... क्रिकेट चाहत्याने पकडला तब्बल १.०८ कोटींचा कॅच! T20 सामन्यातील Video होतोय व्हायरल

सोलापूरमध्ये मोठा ट्विस्ट! काँग्रेसने तिकीट दिल्यानंतर महिला उमेदवारांचा MIM मध्ये प्रवेश, काय दिलं कारण?

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या सुनेला अटक, दीड कोटीची खंडणी घेताना रंगेहात पकडलं

SCROLL FOR NEXT