गृहिणींसाठी खुशखबर! पालेभाज्यांच्या भावात झाली इतकी घसरण.. 
मुंबई

गृहिणींसाठी खुशखबर! पालेभाज्यांच्या भावात झाली इतकी घसरण..

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : महिन्यापूर्वी ऊन-पावसाच्या सुरू असलेल्या खेळामुळे अनेक शेतकऱ्यांनी पालेभाज्यांची लागवड थांबवली होती. मात्र, त्यानंतर पोषक असे वातावरण तयार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली. त्यामुळे घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून, दरात मोठी घसरण झाली आहे. मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्या तर घाऊक बाजारात 10 ते 15 रुपये जुडी या दराने मिळत आहेत. 

पालेभाज्यांबरोबरच फळ भाज्यांची आवकही वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाज्यांचे दर घाऊक बाजारात किलोमागे 40 ते 50 रुपयांनी कमी झाले आहे. वाटाणा 25 ते 35 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्या 50 रुपये किलोपर्यंत मिळत आहेत. फळभाज्यांपेक्षा पालेभाज्यांचे दर कमी असतात. त्यामुळे गृहिणी फळभाज्यांच्या जागी पालेभाज्यांचा पर्याय निवडतात. आता पालेभाज्यांचे दरही घसरले आहेत. त्यामुळे पालेभाज्यांना बाजारात मागणी जास्त आहे. घाऊक बाजारात पंधरा दिवसांपूर्वी 15 ते 20 रुपयांना मिळणारी मेथीची जुडी आता 10 ते 15 रुपये झाली आहे; तर 25 ते 30 रुपये असणारी शेपूची जुडी 15 ते 20 रुपये झाली आहे. 7 ते 10 रुपये जुडी असणारा पालक 4 ते 5 रुपये जुडी झाला आहे. 4 ते 5 रुपयांना मिळणारा पुदिना 3 ते 4 रुपये झाला आहे. 10 ते 14 रुपये असणारी कांदा पात 10 ते 12 रुपये झाली आहे. 

कोथिंबीर 20 ते 25 रुपये जुडी 
गेल्या महिन्यात कोथिंबीरची आवक घटली होती. त्यामुळे कोथिंबिरीच्या दरात वाढ होत 100 रुपये जुडीपर्यंत कोथिंबीर गेली होती. मात्र, आता आवक वाढल्यामुळे कोथिंबीरीचा दर 20 ते 25 रुपये जुडीवर आला आहे. घाऊक बाजारात दरात घसरण झाली असली तरी किरकोळ बाजारात मात्र जादा दराने भाजीपाला विकला जात आहे. 

ही बातमी वाचली का?- मुंबईतील मच्छीमारांचा प्रश्न सुटणार; वाचा काय आहे बातमी..
 
तुलनात्मक दर (रुपये/प्रति जुडी) 
भाजीपाला     गुरुवारचे      पंधरा दिवसांपूर्वीचे 
मेथी        10 ते 15         15 ते 20 
शेपू         15 ते 20         25 ते 30 
पालक       4 ते 5           7 ते 10 
पुदिना       3 ते 4           4 ते 5 
कांदा पात    10 ते 12        10 ते 14 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT