ravindra chavan join bjp Sakal
मुंबई

Ravindra Chavan : राज्यमंत्री रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत व्यापारी संघटनेच्या अध्यक्षाचा शेकडो व्यापाऱ्यांसह भाजपात प्रवेश

भाजपा दिवा शहर अध्यक्ष सचिन भोईर यांचा वाढदिवस आणि दिवा भाजपा कार्यालयाचे उद्घाटनाच्या दिवशी राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत दिवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चेतन पाटील यांनी त्यांच्या शेकडो व्यापाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत नुकताच प्रवेश केला.

सकाळ वृत्तसेवा

दिवा - भाजपा दिवा शहर अध्यक्ष सचिन भोईर यांचा वाढदिवस आणि दिवा भाजपा कार्यालयाचे उद्घाटनाच्या दिवशी राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत दिवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चेतन पाटील यांनी त्यांच्या शेकडो व्यापाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत नुकताच प्रवेश केला.

सचिन भोईर यांचा वाढदिवस बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, कल्याण लोकसभा निवडणुक प्रमुख शशिकांत कांबळे, जिल्हा सरचिटणीस नंदु परब, संदीप लेले यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा झाला.

चेतन पाटील हे गेली अनेक वर्षे दिव्यातील व्यापारी संघटनेचे नेतृत्व करीत आहेत. वडीलांचा थोडासा राजकारणाशी सबंध होता. परंतु पाटील यांनी आजपर्यंत कधीही राजकारणात प्रवेश केलेला नव्हता.

ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हा सत्तेसाठी नव्हे तर जनतेची सेवा करण्यासाठी काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे दिव्यातील व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, ते पुर्ण करण्यासाठी नक्कीच संघर्ष करीन असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.

दरम्यान चेतन पाटील हे दिव्यातील एक नावाजलेलं प्रतिष्ठित व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या प्रवेशामुळे दिवा भाजपाला मोठी ताकत मिळाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

चेतन पाटील यांनी दिवा भाजपाचे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भारतीय जनता पार्टीला अधिक मजबूत करु असा विश्वास दिला आहे. यावेळी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले,

कल्याण लोकसभा निवडणुक प्रमुख शशिकांत कांबळे, जिल्हा सरचिटणीस नंदु परब, संदीप लेले, सचिन भोईर, संदिप माळी, सचिन पाटील, मनोहर सुखधरे, विजय भोईर, समीर चव्हाण, अशोक पाटील, रोशन भगत, मधुकर पाटील, युवराज यादव यांच्यासह अनेक दिवा भाजपाचे पदाधिकारी आणि व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News:मुंबई मेट्रो-3: दिव्यांग प्रवाशांना करावा लागतोय त्रासाचा सामना

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT