मुंबई

प्रतिकुल परिस्थितही रेल्वे श्रमिकांच्या सेवेसाठी सज्ज! वाचा सविस्तर बातमी

सकाळ वृत्तसेवा


मुंबई ः निसर्ग वादळाचा मुंबई तसेच परिसराला तडाखा बसणार असल्यानंतरही श्रमिक स्पेशल सुरु ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य, पश्चिम रेल्वेबरोबरच कोकण रेल्वेवरील नियंत्रण कक्षांना अतीदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

स्थलांतरीत कामगारांसाठी मुंबईतून श्रमिक स्पेशल बुधवारी तसेच गुरुवारी रवाना होणार असल्याचे रेल्वे आधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी रेल्वे सुरक्षा दलास रेल्वे स्थानक परिसरात तैनात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे सुरक्षा दल प्लॅटफॉर्म तसेच स्थानकातील पादचारी पूलांवर तैनात असेल. त्याचबरोबर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यास त्याची परिस्थिती पाहण्यासाठी रेल्वेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी तैनात असतील.

रेल्वेच्या नियंत्रण कक्षास सातत्याने वेधशाळेकडून माहिती मिळणार आहे. त्यानुसार परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. ट्रॅकचे पेट्रोलिंगही सुरु असेल त्याचबरोबर रेल्वेचे इंजिनिअर्सही प्रतिकुल परिस्थितीस सामोरे जाण्यास तयार आहेत, असे रेल्वेच्या आधिकाऱ्यांनी सांगितले. 
जोरदार पाऊस सुरु असताना रेल्वेचे आधिकारी विविध रेल्वे स्थानकांवर तैनात असतील. ते प्लॅटफयर्मवरील परिस्थितीचा तसेच प्रवाशांवर लक्ष ठेवतील. ट्रॅकवर पाणी साचल्यास त्यावेळच्या परिस्थितीनुसार श्रमिक स्पेशलबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी वेधशाळेकडून माहिती घेण्यात येईल. 

मध्य रेल्वेने कुर्ला, शीव, वांद्रे, चुनाभट्टी, मस्जिद बंदर या ठिकाणी विशेष पथके तैनात केली आहेत. या ठिकाणी पाणी साचण्याचा जास्त धोका असतो. त्याचा रेल्वे वाहतूकीवर प्रतिकुल परिणाम होतो. अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगालला धडकले होते, त्यावेळी रेल्वेने त्या परिसरातील वाहतूक पूर्ण रोखली होती, पण मुंबईबाबत परिस्थितीनुसारच निर्णय होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

SCROLL FOR NEXT