मुंबई : खासगी रुग्णालयात 80 टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या आणि उपचार खर्चावरच्या नियमांच्या निर्णयावर राज्य सरकार लवकरच पुनर्विचार करणार आहे. कोरोना काळात रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता; मात्र सध्या कोरोना रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने खाली आला असून, मुंबईत रुग्णालयात मोठ्या संख्येने खाटा रिकाम्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भात राज्य सरकारला निर्देश दिले होते. या निर्णयाचा फेरआढावा घेणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खासगी रुग्णालयांमधील कोव्हिड आरक्षित बेडच्या औषधांवरील उपचार शुल्क नियमित करण्यावर चर्चा सुरू आहे. सध्या सरकारी तसेच खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठीच्या रिकाम्या खाटांचा आढावा घेणे सुरू आहे. सध्याची कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जर ही संख्या सरकारी रुग्णालये हाताळू शकतील तर कोरोना खाटासांठीचे शुल्क नियंत्रित केले आहे त्यांची संख्या कमी किंवा त्यांना काढता येईल; मात्र अजूनपर्यंत कुठलाच निर्णय घेतला गेला नाही. डिसेंबर 2020 मध्ये राज्य सरकारने 28 फेब्रुवारीपर्यंत खासगी रुग्णालयांनीही कोव्हिड रुग्णांसाठीच्या आरक्षित खाटांवर सरकारने ठरवल्याप्रमाणे शुल्क आकारणे बंधनकारक केले आहे.
एकट्या मुंबईत 13,502 अलगीकरण खाटांपैकी फक्त 3328 केवळ खाटा व्यापल्या आहेत. यामध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील रुग्णसंख्येचा समावेश आहे. कोव्हिड रुग्णसंख्या आटोक्यात आलेल्या मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षी नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय डोम) जम्बो कोव्हिड सुविधा बंद केली.
बेड आरक्षणाच्या मुद्द्यावर या आठवड्यात चर्चा करण्यासाठी ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांची यांची भेट घेतील. आवश्यकता होती तेव्हा खासगी रुग्णालयांनी सरकारच्या निर्देशांचे पालन केले. आम्हाला आशा आहे की कोव्हिड रुग्णांसाठी राखीव असलेल्या बेडची संख्या कमी करण्यास सरकार तयार होईल. सध्या नॉन-कोव्हिड रुग्णही वाढत आहेत.
- डॉ. गौतम भन्साळी,
चिकित्सक सल्लागार, बॉम्बे रुग्णालय
Reconsideration of reserved beds in private hospitals Bed empty due to corona patient depletion in mumbai
----------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.