मुंबई

ठाणे जिल्ह्यातील रुग्ण संख्येत आज विक्रमी नोंद! एकाच दिवसात 117 नवीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा


ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात आतापर्यंतची सर्वात उच्चांकी नोंद मंगळवारी (ता.5) करण्यात आली. मंगळवारी जिल्ह्यात 117 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून एका मृत्यूची देखील नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 1 हजार 399 वर पोहोचला असून  मृतांचा आकडा 35 वर गेला आहे.

जिल्ह्यात शनिवारपासून कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी उच्चांकी गाठत आहे. यात शनिवारी 97 , रविवारी 74, तर  सोमवारी 99 बाधितांची नोंद करण्यात आली. या ३ दिवसांत 5 बाधितांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यात मंगळवारी तर, सर्वात उच्चांकी 117 नवीन बाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्यावरील संकट गडद होत असल्याचे दिसून येत आहे.

मंगळवारी नवी मुंबईत सर्वाधिक 46  नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून तेथील बाधितांचा आकडा 394 वर पोहोचला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 39 नव्या बाधितांमुळे तेथील बाधितांचा आकडा 451 वर गेला आहे. कल्याण-डोंबिवलीत 11 नव्या रुग्णांमुळे तेथील बाधितांचा आकडा 224 झाला. तसेच मीरा-भाईंदरमध्ये 8 नवे रुग्ण आढळून आल्याने तेथील संख्या 189 झाली असून एकाच्या मृत्यूमुळे तेथील मृतांचा आकडा 5 वर गेला आहे.

भिवंडीत एका बाधिताच्या नोंदीमुळे बाधितांचा आकडा 20 तर उल्हासनगर पालिकताक्षेत्रात दोन नव्या रुग्णांमुळे बाधितांचा आकडा 16 वर गेला आहे. तसेच बदलापूरमध्ये 5 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील आकडा 42 वर पोहोचला आहे. तर,  ठाणे ग्रामीण भागात देखील 3 नव्या बाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे तेथील बाधितांचा आकडा 50 वर गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासल्या नाहीत तर Claimच्या वेळी बसू शकतो मोठा धक्का!

IND vs WI: मॅचच्या काही तास आधी मोठं संकट! इकाना स्टेडियमजवळ गोमतीचं पाणी, अंडरपास जलमय; भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह?

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर कर्जतला पहाटे दाट धुक्याची चादर; आल्हाददायक वातावरणाने नागरिक सुखावले

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT