Maharashtra Rain Update  esakal
मुंबई

मुंबईकरांनो सावधान; पुढचे २४ तास धोक्याचे!

दुपारी एक वाजल्यापासून पुढच्या २४ तासांपर्यंत मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

जूनमध्ये दडी मारून बसलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगलाच जोर धरला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून काही भागांमध्ये रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. मुंबईतही पुढचे २४ तास धोक्याचे असल्याचं सांगण्यात येत आहे. (Weather Update)

हवामान विभागाने (IMD) मुंबईकरांना धोक्याचा इशारा दिला आहे. दुपारी एक वाजल्यापासून पुढचे २४ तास धोक्याचे असून या काळासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या २४ तासांत मुंबईकरांनी प्रवास आणि आपल्या दैनंदिन कामकाजाचं नियोजन करताना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.

दरम्यान, राज्यभरात आता मॉन्सून (Monsoon Alert) सक्रिय झाला आहे. त्यामुळे पुढे चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही भागात अतिवृष्टी तर घाट परिसरात रेड अलर्ट जारी कऱण्यात आला आहे.

रेड अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे -

पुणे, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा.

ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे -

नाशिक, चंद्रपूर

यलो अलर्ट असलेले जिल्हे -

धुळे, परभणी, नागपूर, जळगाव, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नांदेड, बुलडाणा, वाशिम, अकोला, गोंदिया, अमरावती, भंडारा, गडचिरोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT