मुंबई

मुंबईतील कंटेनमेंट झोन कमी करण्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय, असे बदलू शकतात नियम

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता.15: मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्राची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेने महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. तीन व त्या पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या ठिकाणंंच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. तर 14 दिवसांचा विलगीकरणाचा कालाबधि 10 दिवसांवर आणण्यात येणार आहे. पोलिस आणि महापालिकेच्या यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 2 हजार 651 पैकी 1 हजार 553 इमारती  प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. 

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरुवारी महापालिकेचे सर्व पक्षिय गटनेते, विविध समित्यांचे अध्यक्ष यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरंसींगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी आयुक्तांनी ही माहिती दिल्याचे समजते.

सध्या एका इमारतीत एक रुग्ण सापडला तरी तो भाग प्रतिबंधित  झोन म्हणून घोषित करण्यात येतो. यापुढे तसे न करता त्या रुग्णाला तातडीने पालिकेच्या अलगीकरण कक्षात हलवले जाणार आहे. तसेच रुग्णांच्या नजिकच्या व्यक्तींना घरात विलगीकरण केले जाणार आहे. मात्र, हा निर्णय फक्त इमारतीसाठी लागू करण्याचा विचार सुरु आहे.

यामुळे पोलिस आणि पालिका यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल. तसेच नागरीकांना होणारा त्रासही कमी होईल असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

सध्या कोणतीही लक्षणं नसलेल्या कोरोना बाधित व्यक्तीला 14 दिवस विलगीकरण केले जाते. मात्र,सात दिवसांपासून 10 व्या दिवसापर्यंत या व्यक्तीत कोणतीही लक्षणं न दिसल्यास त्याला घरी पाठविण्यात येईल पण 7 दिवस एकांतात राहाणे सक्तीचे करण्यात येणार आहे. 

to reduce number of contentment zones BMC might change these rules

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT