मुंबई

Remdesivir Injection:रेम्डेसिवीर इंजेक्शनची किंमतीत घट, जाणून घ्या नवी किंमत

मिलिंद तांबे

मुंबई: राज्यात कोविड19 रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. दरदिवशी सुमारे 10 हजार नवीन रुग्ण वाढत आहेत. यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यता असून रुग्णालयात दाखल रुग्णांना रेम्डेसिवीर इंजेक्शन माफक दरात उपलब्ध व्हावी यासाठी त्याच्या किंमती कमी करण्याचा निर्णय राज्य अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. रेम्डेसिवीर इंजेक्शन 1500 रुपयात उपलब्ध करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याच्या मंजुरीसाठी राष्ट्रीय औषध किंमत नियंत्रण प्राधिकरण, नवी दिल्ली दिल्लीला पाठवण्यात आला आहे.

कोविड 19 आजाराच्या रुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याच औषधांचा वापर होत आहे. प्रामुख्याने रेम्डेसिवीर इंजेक्शन हे औषध या आजारावर प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. राज्यात जानेवारी 2021 अखेर पर्यंत कोविड रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर रेम्डेसिविर इंजेक्शनची मागणी देखील कमी झाल्याचे दिसून आले. फेब्रुवारी, 2021 पासून रुग्णालये आणि रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना या औषधाची विक्री किंमत कमी करण्यात आली. मात्र छापील विक्री किंमत कमी करण्यात आली नाही. त्यामुळे सदर विक्री किंमत कमी करण्यात आलेल्या किंमतीचा लाभ रुग्णांना न मिळता त्यावर छापील विक्री किंमतीनुसार आकारणी होत असल्याने ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दड पडत असल्याचे दिसून आले.

अन्न व औषध प्रशासन तसेच वैद्यकिय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग यांनी या प्रकरणी कार्यवाही घेण्याच्या दिलेल्या सुचनेनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. पडताळणीनंतर रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी सदर औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच रुगणालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना सुमारे 800 ते 1300 रुपयांनी म्हणजे सरासरी 1040  रुपये किंमतीत केल्याचे आढळून आले.

तथापि याबबत रुग्णालयांनी रुग्णांना आकारलेल्या किंमतीबाबत पडताळणी केली असता काही रुग्णालये त्यांच्या खरेदी किंमतीवर 10 ते 30 % अधिक रक्कम आकारून छापील किमतीपेक्षा कमी किंमतीत रुग्णास उपलब्ध करीत असल्याचे परंतु बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असून देखील छापील किंमत आकारून मोठ्या प्रमाणावर नफा कमावत असल्याचे दिसून आले.

त्यामुळे याबाबत अन्न व औषध प्रशासन, यांनी दाखल घेऊन सदर रेम्डेसिवीर इंजेक्शनची उत्पादकांची विक्री किंमत आणि प्रत्यक्षात रुग्णांना आकारण्यात येणारी किंमत यामधील तफावत कमी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली. यासंदर्भात सदर रेम्डेसिवीर इंजेक्शन उत्पादित करणाऱ्या उत्पादकांची अन्न व आषध प्रशासनाकडून बैठका घेण्यात आल्या. 

या बैठकांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असून देखील रुग्णांना छापील किंमत आकारीत असल्याचे दिसून आले आहे. याबाबतचा प्रशासनाने शासनास सविस्तर अहवाल सादर केला असून शासनाने रुग्णालयांना सदर रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या खरेदी किंमतीवर जास्तीत जास्त 30 % जास्त किंमत आकारण्याबाबत निर्देश देण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले आहे.

तसेच याबाबत आज रोजी अन्न व औषध प्रशासनाने रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या सर्व उत्पादकांना सदर औषधाच्या किंमती त्यांच्या विकी किंमतीच्या जास्तीत जास्त 30 % जास्त आकारून एमआरपी निश्चित करण्याबाबतचे निर्देश दिलेले असून लवकरच रेम्डेसिबीर इंजेक्शनच्या किंमती कमी होण्याची अपेक्षा आहे.

-------------------

(संपादन- पूजा विचारे)

Reduce the price of remedicivir injection check out here new price

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT