मुंबई

उत्सवादरम्यान शारिरीक संपर्क नकोच, संपर्काशिवाय शुभेच्छा द्या!

भाग्यश्री भुवड

मुंबई: आज दसरा साजरा करण्यात येत आहे. या वेळी शुभेच्छा देण्यासाठी गळाभेट करत असाल तर आताच सावध व्हा असा सल्ला वैद्यकीय तज्ञ देत आहेत. कोरोना संख्या कमी होत असली तरी कोरोना गेला नाही याचे भान वैद्यकीय तज्ज्ञ आणून देत आहेत. 

उत्‍सवी हंगाम सर्व स्‍तरातील लोकांना एकत्र आणतो. मात्र यंदा स्थिती अत्यंत वेगळी आहे. आता नवरात्री सुरू असताना दसरा, दिवाळी आणि नाताळ तोंडावर आलेत. त्यामुळे नागरिकांना सार्वजनिक संमेलन टाळण्‍याचा, सामाजिक शिष्‍टाचार पाळण्‍याचा आणि घरामध्‍येच सण साजरा करण्‍याचा सल्‍ला देण्‍यात आला आहे. केंद्रिय आरोग्‍य मंत्रालयाने जारी केलेल्‍या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे असे फोर्टीज रुग्णालयाच्या इन्‍फेक्शिअस डिसीज स्‍पेशालिस्‍ट डॉ. किर्ती सबनीस यांनी सांगितले. 

डॉ सबनीस यांनी सांगितले की, उत्सवांमधून संसर्गामध्‍ये मोठी वाढ होण्‍याची शक्‍यता असते. तसेच तोंडावर आलेला हिवाळा ऋतूदरम्‍यान कोविड-19 संदर्भात योग्‍य ती काळजी घेण्‍याचे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. ही अत्‍यंत महत्त्वाची वेळ असून आरोग्‍यसेवा यंत्रणा, डॉक्‍टर्स, परिचारिका आणि नागरी प्राधिकरणे कोविड-19 विरोधातील लढा देत आहेत. त्यामुळे हा संसर्ग अधिक पसरू नये म्हणून उत्सव साजरे करताना सामाजिक शिष्‍टाचारांचे पालन करण्यात यावे असे ही त्या म्हणाल्या. 

उत्सवातील सूचना

  • शारीरिक संपर्क न करता शुभेच्‍छा द्या.
  • सद्यस्थितीमध्‍ये हाताने नमस्‍कार करणे ही सुरक्षित शुभेच्‍छा आहे.
  • मोठे संमेलने टाळा.
  • आरोग्य यंत्रणांनी जारी केलेल्‍या नियमांचे पालन करा.
  • श्‍वसनविषयक शिष्‍टाचार राखा. 
  • खोकला, डोकदुखी किंवा सौम्‍य ताप अशी लक्षणे असल्‍यास बरे होईपर्यंत घरीच राहा.
    -------------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Refuse physical contact during festival Suggestions festive days health experts

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT