File Photo
File Photo 
मुंबई

चोक्‍सीवरील कारवाईला स्थगिती देण्यास नकार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) सुमारे १२ हजार ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी याच्या विरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलेल्या आरोपीच्या विरोधातील कारवाई थांबवणे योग्य नाही, असे मतही उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) यांनी चोक्‍सीच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. न्यायालयाने त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले असून, त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईविरोधात त्याने परदेशातून याचिका केली होती. विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील काही साक्षीदारांची उलटतपासणी घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्याने केली होती. 

यावर बुधवारी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाने निकालपत्र जाहीर केले. सुधारित कायद्यानुसार आरोपींवर केलेली कारवाई थांबवणे अयोग्य आहे. त्यामुळे तपास कामात समस्या निर्माण होऊ शकतात, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

चोक्‍सी मागील कित्येक महिन्यांपासून परदेशात असून, प्रकृतीचे कारण देऊन न्यायालयात हजर राहात नाही. अनेकदा समन्स बजावले, तरी तो उत्तर देत नसल्याचे ईडीतर्फे सांगण्यात आले. ईडीने त्याच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याची कारवाई सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT