dr pradip 
मुंबई

महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तनप्रकरणी डॉ. प्रदीप जाधव यांच्यावर गुन्हा

दिलीप पाटील

वाडा : वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा ग्रामीण रुग्णालयात गेल्या सहा वर्षांपासून डॉ. प्रदीप जाधव हे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करणे, लज्जा उत्पन्न होईल असे हवभाव करणे, कामावर असताना महिला कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अधिकारी कक्ष व डॉक्‍टरांच्या घरी वारंवार बोलावणे, अश्‍लील संभाषण करणे अशी फिर्याद एका परिचारिकेने पोलिस ठाण्यात केली आहे. त्याअनुषंगाने डॉ. प्रदीप जाधव यांच्यावर भा.द.वि. कलम 354 अ, 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप जाधव हे फरारी असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास वाडा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक अलका करडे करीत आहेत. 

(संपादन : वैभव गाटे )

registered FIR against dr Pradip Jadhav in wada

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT