मुंबईत उद्यापासून रिलायन्स जिओची 5Gची सेवा सुरु होणार आहे. या मोठ्या निर्णयानं जिओनं मुंबईकरांना दसऱ्याचं गिफ्ट दिलं आहे. त्यामुळं मुंबईकरांचा सर्वात आधी वेगवान इंटरनेटच्या युगात प्रवेश होणार आहे. (Reliance Jio to start beta trials of its 5G service in Delhi Mumbai Kolkata and Varanasi on Dussehra)
एएनआयच्या माहितीनुसार, रिलायन्स जिओ उद्यापासून मुंबईसह दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी या मेट्रो शहरांमध्ये 5G सेवेची बीटा ट्रायल सुरु करणार आहे. आता, जर तुम्ही या 4 शहरांपैकी कोणत्याही शहरात राहत असाल आणि तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल, तर तुम्हाला Jio 5G वेलकम ऑफरचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने आत्तापर्यंत कोणत्याही 5G प्लॅनची घोषणा केलेली नाही, याचा अर्थ असा आहे की वेलकम ऑफर अंतर्गत 5G फोन असलेले Jio वापरकर्ते मोफत 5G सेवेत प्रवेश मिळवू शकतील. कारण, जेव्हा जिओनं 2017 मध्ये 4G सेवा लाँच केली होती तेव्हा वेलकम ऑफरची घोषणा केली होती. ज्यामध्ये अधिकृत योजना जाहीर होईपर्यंत युजर्सना 4Gवर विनामूल्य प्रवेश मिळाला होता. यावेळीही जिओ हीच रणनीती अवलंबण्याची शक्यता आहे.
काय आहे Jio 5G वेलकम ऑफर?
Jio 5G वेलकम ऑफर अंतर्गत टेलिकॉम ऑपरेटर 1gbps पेक्षा अधिक स्पीडसह अमर्यादित 5G डेटा ऑफर मिळेल.
Jio 5G वेलकम ऑफर कशी मिळवायची?
ज्या युजर्सकडे 5G स्मार्टफोन्स आहेत त्यांचे फोन आपोआप Jio 5G वेलकम ऑफरमध्ये अपग्रेड होतील. त्यामुळं, युजर्सना वेलकम ऑफरमध्ये अपग्रेड करण्यासाठी कोणत्याही वेगळ्या प्रक्रियेचा अवलंब करावा लागणार नाही.
Jio 5G वेलकम ऑफरसाठी पात्र कसे आहेत?
दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि वाराणसी या चार शहरांमध्ये 5G स्मार्टफोन असलेल्या लोकांना Jio 5G वेलकम ऑफरमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
Jio 5G वेलकम ऑफर मोफत उपलब्ध आहे का?
सध्या ही ऑफर मोफतच आहे. त्यामुळं पात्र युजर्स अमर्यादित Jio 5G ची सेवा मोफत मिळवू शकतील. किमान Jio 5G योजना जाहीर करेपर्यंत कंपनीनं अद्याप कोणताही Jio 5G प्लॅन लॉन्च केलेला नाही.
Jio 5G वापरण्यासाठी तुम्हाला नवीन सीम आवश्यक आहे का?
तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असल्यास, तुम्हाला 5G वापरण्यासाठी नवीन सीमची गरज नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.