मुंबई

मुंबईकरांनो तुमचं भवितव्य 'हे' 8 हजार लोकं ठरवणार, वाचा काय बातमी आहे...

समीर सुर्वे

मुंबई : कोरोना बाधित व्यंक्तीच्या संपर्कातील 2 हजार आणि लांबच्या संपर्कातील साधारण सहा हजार व्यक्तींवर मुंबईचं भविष्य आहे. त्यामुळे 2 हजार हायरिस्क व्यक्तींना मुंबई महापालिकेने या सर्वांना सक्त निगराणी खाली ठेवले आहे. मुंबईत आज सकाळ पर्यंत 1700 हून अधिक रुग्णांची नोद झाली आहे. एखादा रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या निकटवर्तीयांची तपासणी केली जाते. यात हाय रिस्क आणि लो रिस्क अशी श्रेणी ठरवली जाते. 

हायरिस्क 2 हजार व्यक्तीपैकी साधारण 10 टक्के व्यक्तींमध्ये कोरोना आढळेल असा पालिकेचा अंदाज आहे. मात्र तशी खात्री देता येत नाही. तसेच या व्यक्तींनी क्वारंटाईन काटेकोरपणे पाळल्यास कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता कमी आहे.  म्हणूनच '2 हजार हायरिस्क नागरीकांना क्वारांटाईन करण्यात आले आहे'. असे महापालिका अतिरीक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले. 

मुंबईत आतापर्यंत 481 ठिकाणं सिल करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात सील  केलेल्या भागांची संख्या तब्बल 100 ने वाढली आहे. 8 एप्रिल रोजी शहरातील 381 ठिकाणं सिल करण्यात आली होती. कोरोनाची बाधा झाल्यानंतर साधारणं 5-6 दिवसात सर्दी खोकल्याची लक्षणं दिसू लागतात. तर 14 -15 दिवसात बाधा झाली आहे का नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे या हायरिस्क तसेच लो रिस्क व्यक्तींंना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले जातेे.

मुंबईत आतापर्यन्त कोरोना बाधित रुग्ण आढळलेली 438 ठिकाणं सील करण्यात आली आहेत. आठवडा भरात 57 ठिकाणांची यामध्ये वाढ झाली आहे. 8 एप्रिल रोजी 381 ठिकाणं सील करण्यात आली होती.

removal of mumbais lockdown depends on eight thousand people who are currently under observation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT