मुंबई

नाट्यकर्मींना दिलासा, मुंबई महानगर पालिकेच्या नाट्यगृहांचे भाडे 75 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय

समीर सुर्वे

मुंबई, ता. 17: मुंबई महानगर पालिकेच्या नाट्यगृहांचे भाडे 75 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. प्रत्येक खेळासाठी 5 ते 10 हजार रुपये भाडे निर्मात्यांना द्यावे लागणार आहे. मात्र, त्यासाठी तिकीट दर 400 रुपयांपर्यंत ठेवणे बंधनकारक असणार आहे. तर, बालनाट्यांचे खेळही महापालिकेच्या नाट्यगृहात करण्यावर बंदी ठेवण्यात आली आहे.

कोविड काळात बंद असलेली नाट्यगृह नोव्हेंबर महिन्यापासून सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मात्र, नाट्यगृहाच्या आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थीत राहाण्याची परवानगी आहे. कोविड काळात झालेली आर्थिक कोंडी आणि प्रेक्षकांची कमी उपस्थीती यामुळे निर्मात्यांना नाटकाचे प्रयोग करणे अवघड झाले होते. त्यामुळे पालिकेने नाट्यगृहांचे भाडे कमी करण्याची मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार महापौरांनी प्रशासनासोबत चर्चा करुन आज नाट्यगृहांचे भाडे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेची बोरीवली प्रबोधनकारक ठाकरे, विलेपार्ले येथे दिनानाथ मंगेशकर आणि मुलूंड येथे महाकवी कालीदास अशी तीन नाट्यगृह आहेत.

नाट्य निर्मात्यांना भाड्यात सवलत देताना महानगरपालिकेने बालनाट्यांच्या प्रयोगावर बंदी आणली आहे. त्याचबरोबर असं क्षमतेच्या निम्म्या प्रेक्षकांना उपस्थीत राहाण्याची परवानगी दिली आहे. तर, मास्क वापरणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

  • मराठी नाटक वाद्यवृंद - पुर्वीचे भाडे 19 हजार 850 (वस्तू व सेवा कर वगळून ); आता 5 हजार रुपये (वस्तू व सेवा कर वगळून )
  • मराठी नाटक आणि वाद्यवृंद - पुर्वी 39 हजार 690 भाडे (वस्तू व सेवा कर वगळून); आता 10 हजार रुपये (वस्तू व सेवा कर वगळून )

लघु नाट्यागृहांच्या भाड्यातही कपात

बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर संकुलात लघुनाट्यगृहही आहे. या नाट्यगृहाच्या भाड्यातही कपात करण्यात आले आहे. मराठी नाटक आणि वाद्यवृंदासाठी तीन हजार आणि अमराठी नाटक, वाद्यवृंदासाठी सहा हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. मात्र, तिकीटदर 150 रुपयांपर्यंत ठेवणे बंधनकार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

rent of BMC theaters in mumbai reduced by 75 percent big relief to producers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT