Mumbai Sakal
मुंबई

सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुर्नगठन

अध्यक्षांसह १४ जणांची निवड तर सदस्य सचिवपदी डॉ. बाबा भांड

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराजा सयाजीराव गायकवाड यांची ग्रंथसंपदा प्रकाशित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने चरित्र साधने प्रकाशन समिती पुनर्गठीत केली आहे. यात समितीच्या अध्यक्षपदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह १४ जणांची निवड करण्यात आली असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक डॉ. बाबा भांड यांची सदसरू सचिवपदी निवड केली आहे.

सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीकडून सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावर आधारीत २५ नियोजीत ग्रंथांचे प्रकाशन केले जाणार असून त्यापैकी आत्तापर्यंत १२ ग्रंथांच्या खडांची छपाईचे काम पूर्ण करण्यात आले आहे. समितीची मुदत ही १७ऑक्टोबर २०१९ रोजी संपली होती. मात्र त्यानंतर पुढे १३ व्या खंडाचे काम पूर्ण झाल्याने त्या खंडाच्या छपाईचे काम पूर्ण करण्यासाठी समितीला सहा महिन्याचा कालावधी वाढवून देण्यात आली हेाती.

त्याच पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाकडून या समितीने पुनर्गठन करण्यात आले असून यात उच्च शिक्षण मंत्री अध्यक्ष, राज्यमंत्री हे उपाध्यक्ष आणि विभागाचे प्रधान सचिव सदस्य तर संचालक हे निमंत्रक म्हणून निवड करण्यात आली आहे. तर उर्वरित सदस्यांमध्ये शासकीय मुद्रणालयाचे संचालक यांचा समावेश आहे. त्यासोबत राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड, नागपूरच्या अनुराधा मोहिनी, कोल्हापूरच्या डॉ. भारती पाटील, बडोदे येथील प्रकाश पेठे, मंदा हिंगुराव, लातूर येथील प्रा. शिवाजी देवनाळे, औरंगाबाद येथील डॉ. विजय शिंदे आणि कोल्हापूर येथील दिनेश पाटील यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या समितीला सुरूवातीला तीन वर्षेपर्यंत मुदत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT