मुंबई

फॉर्च्युन हॉटेलमधल्या भीषण आगीतून 'त्या' डॉक्टरांची सुटका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- मेट्रो सिनेमा परिसरात असलेल्या हॉटेल फॉर्च्युनमध्ये आग लागण्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही भीषण आग लागल्याची माहिती मिळतेय. सुदैवानं या आगीत जीवितहानी टळली आहे. या हॉटेलमध्ये जवळपास 25 डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व डॉक्टरांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. मेट्रो सिनेमा या चित्रपटगृहाजवळ हे फॉर्च्युन हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आगीचा भडका उडाला. 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीतून 25 डॉक्टरांची सुटका केली असून आग विझवण्यात जवानांना यश आलं आहे. 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. आग लागली तेव्हा या परिसरात धुराचे लोट पसरले होते. मात्र आग लागल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 फायर गाड्या आणि 4 जंबो टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. चौथ्या मजल्यावर अडकलेल्या डॉक्टर्सना बाहेर काढण्यासाठी शिडीचा वापर करण्यात आला. बचावकार्य संपल्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आला आणि  शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे. 

दरम्यान सध्या या सर्व डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था ट्रायडंट हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. स्थानिक लोकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT