मुंबई

दहावी आणि बारावीच्या निकालांबाबत मोठी बातमी, जाणून घ्या कधी लागणार निकाल...

सकाळवृत्तसेवा

मुंबई: प्रत्येक वर्षी दहावी आणि बारावीच्या विध्यार्थ्यांसाठी मे आणि जून हे महिने अतिशय महत्वाचे असतात. बोर्डाचा निकाल काय लागणार याची उत्सुकता सर्वांनाच असते. यावर्षी जगात आणि देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. म्हणूनच यंदा परीक्षा रद्द करण्यात आल्यात.  मात्र यावर्षी निकाल कधी लागणार, निकाल लागल्यानंतर पुढे ऍडमिशन कधी होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात प्रश्नचिन्ह होतंच. अशातच या वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या निकालाच्या संभाव्य तारखा आल्या आहेत.

कोरोनामुळे देश लॉक डाऊन करण्यात आला आणि त्यामुळे दहावी आणि बारावीचे शेवटचे पेपर रद्द करण्याची वेळ आली होती. मात्र आता शिक्षकांचं पेपर तपासण्याचं काम सुरु झालंय अशी माहिती बोर्डाकडून मिळाली आहे. कोरोनामुळे पेपर तपासण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल जुनच्या दुसऱ्या आठवड्यात लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार मूल्यांकन जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होऊन निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दहावी आणि बारावीचे निकाल १० जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे. विद्यार्थी हा निकाल maharesults.nic.in या वेबसाईटवर पाहू शकणार आहेत.

"पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा या १ जुलै ते १५ जुलै २०२० दरम्यान घेण्यात याव्यात तसंच  बारावी नंतरचा प्रवेश लवकरात लवकर देऊन १ सप्टेंबर २०२० पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करावी अशा सूचना आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. परीक्षा आणि पुढचं शैक्षणिक वर्ष याचं वेळापत्रक तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे", असा उदय सामंत यांनी म्हंटलंय.

results of ssc and hsc are expected to come in second week of june read full news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाने घरावर छापा टाकून विदेशी दारूचा लाखो रुपयाचा साठा केला जप्त

HSC Economic Paper : बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरच्या वेळापत्रकात अंशतः बदल

Sheikh Hasina: शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या घोषणेनंतर बांगलादेशात हिंसाचार; पंतप्रधान म्हणाले, आता खूप झाले...

Groundnut Rate Hike : शेंगदाण्याने गाठला दीडशेचा उच्चांक; पंधरा दिवसांत पाच रुपयांची वाढ; उत्पादनात मोठी घट

PM Narendra Modi: 'कितीही खाऊ घातले तरी तुमचे पोट भरत नाही...'; पंतप्रधान मोदींनी उद्योगपतींना फटकारले

SCROLL FOR NEXT