मुंबई- गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन उपनगरी रेल्वेसेवा सोमवारपासून पुन्हा रुळावर आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे मुंबईची लोकल सेवाही बंद करण्यात आली होती. राज्य सरकारअंतर्गत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही लोकल सेवा सुरू झाली आहे. पालिका, पोलिस, बेस्ट अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही लोकल सेवा असून याबाबतचे नियोजन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. लोकल सुरु केल्यानंतर केवळ 2 दिवसात म्हणजेच सोमवार आणि मंगळवारी पश्चिम रेल्वेनं 20 लाख 38 हजार 109 रुपयांची कमाई केली.
लोकल सेवा सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेनं 11 लाख 75 हजार 178 रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जूनला दुपारी 4 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेनं 8 लाख 62 हजार 931 रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशी रेल्वेनं 114 तिकीट खिडक्या तर दुसऱ्या दिवशी 89 खिडक्या उघडण्यात आल्या. सोमवारपासून रेल्वेचे 175 कर्मचारी आणि दुसऱ्या दिवशी एकूण 138 कर्मचारी कार्यरत होते.
पहिल्या दिवशी 6889 एकेरी प्रवासाची तिकिटं विकली गेली. 3 हजार 236 लोकांनी पास घेतला. 932 लोकांनी मासिक पासची मुदतवाढ घेतली. दुसऱ्या दिवशी 2 हजार 534 प्रवाशांनी मासिक पास घेतला तर 1 हजार 839 लोकांनी पासचा अवधी वाढवून घेतला.
'या' अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मिळणार प्रवेश
मंत्रालय, बृहन्मुंबई महानगरपालिकेसह इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी, पोलिस, बेस्ट तसंच खासगी रुग्णालयांचे कर्मचारी आणि कंत्राटी तत्वावर कार्यरत आरोग्य कर्मचारी यांना या प्रवासाची मुभा असेल, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. अनेकांचे मासिक, द्विमासिक आणि त्रैमासिक पास संपले असल्यानं रेल्वेकडून स्टँम्प मारून या पासला मुदतवाढ दिली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.