मुंबई

NCB ने तपास CBI कडे सुपुर्द करायला हवा; NCB ला तपासाचा अधिकार नाही; सतीश मानेशिंदेंचा युक्तिवाद

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 24 : अमलीपदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वतीने आज एनसीबी करीत असलेल्या तपासाला मुंबई उच्च न्यायालयात विरोध करण्यात आला. रियाला हेतुपुरस्सर केन्द्रीय तपास यंत्रणा लक्ष्य करीत आहेत, असा आरोप करण्यात आला. यावर एनसीबीला खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

रिया आणि तिचा भाऊ शौविकच्या जामीन अर्जावर आज न्या. सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. मात्र तरीही अमलीपदार्थ प्रतिबंधक विभाग  ( एनसीबी ) तपास करीत आहे. एनसीबीने हा तपास सीबीआयकडे सुपुर्द करायला हवा, एनसीबीला याप्रकरणी तपासाचा अधिकार नाही, सीबीआय देखील एनडीपीएस कायद्यानुसार तपास करु शकते, असा युक्तिवाद रिया आणि शौविकच्या वतीने एड. सतीश मानेशिंदे यांनी केला.

सुशांतला ड्रगचे व्यसन होते आणि त्याच्यासाठी ड्रग घेतले होते, त्याचे कधीही सेवन केले नाही, असेही रियाच्या वतीने सांगण्यात आले. तो नेहमी त्याच्या जवळच्या व्यक्तींना ड्रगसाठी वापरायचा असेही रिया आणि शौविकच्या वतीने सांगण्यात आले. अन्य आरोपींजवळ अत्यल्प प्रमाणात अमली पदार्थ मिळाले आहेत. मात्र ते कायदेशीर दृष्टिकोनातून गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.

न्यायालयाने एनसीबीला सोमवारपर्यंत या आरोपांबाबत खुलासा करण्याचे निर्देश दिले. यावर पुढील सुनावणी पुढील मंगळवारी म्हणजे 29 सप्टेंबररोजी होणार आहे. अन्य तीन आरोपींनीही जामीनासाठी अर्ज केला आहे.

rhea chakrabortys satish mane shinde NCB CBI court arguments details

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा तडाखा! कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Lightning Strike Tragedy: सिल्लोडच्या दहिगावात शेतातील झोपडीवर वीज कोसळून पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT