मुंबई

मुंबई - अलिबाग रो-रो सेवा मार्चपर्यंत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई आणि अलिबाग ही दोन शहरे जवळ आणणाऱ्या रो-रो सेवेला शिवजयंतीचा मुहूर्त मिळणार अशी चर्चा होती. परंतु मेरिटाईम बोर्डाचे अध्यक्ष डॉ. एन. रामास्वामी यांनी या चर्चेला पूर्णविराम देताना ही सेवा फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. 

मांडवा (अलिबाग) ते भाऊचा धक्का (मुंबई) अशी रो-रो सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे बोटीमधून बस, कार, मोटरसायकल आणि अन्य वाहने घेऊन जाता येणार आहेत. अवघ्या तासाचा हा प्रवास असेल. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. 

केंद्र सरकारने जलवाहतुकीला प्राधान्य दिले असून "सागरमाला' प्रकल्पांतर्गत अनेक ठिकणी रो-रो सेवा सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार अलिबाग (मांडवा)- मुंबई- नवी मुंबई यादरम्यान रो-रो सेवा सुरू करण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील अलिबाग-मुंबई ही सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याला रामास्वामी यांनीही दुजोरा दिला आहे. त्यांनी "सकाळ'ला सांगितले की, रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी हा मैलाचा दगड ठरणार आहे. ही सेवा फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल.

रो-रो सेवेसाठी "प्रोटो पोरोस एक्‍सव्ही' ही रो-रो बोटही मुंबई बंदरात दाखल झाली आहे. 2016 मध्ये रो-रो सेवेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. 135 कोटींच्या प्रकल्पाचे कंत्राट डीव्हीपी इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीला देण्यात आले होते. प्रवासी तळ, जेट्टी, ब्रेक वॉटर, टर्मिनल ही प्राथमिक कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ही सेवा सुरू होणे अपेक्षित होते. पण बोट आणण्यात काही अडचण निर्माण झाल्या होत्या. 

आता नवीन करार करून बोट सेवा सुरू होणार आहे. बोटीमधून 50 वाहने नेण्याची क्षमता आहे. तसेच सुमारे 200 प्रवाशांची क्षमता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT