मुंबई

आधी हिरवा पाऊस, आता गुलाबी रस्ते ; नागरिक भयभीत..

सकाळवृत्तसेवा

कल्याण : डोंबिवली औद्योगिक क्षेत्रांमधील प्रदूषणाच्या समस्येने रहिवासी हैराण असतानाच आता रस्त्यांवर गुलाबी रंगाचे रसायन पसरल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हिरवा पाऊस, सततचे होणारे प्रदूषण यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत.

त्यातच आता रस्त्यावर गुलाबी रंगाचा रसायनमिश्रीत मातीचा थर पसरल्याने नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करणेही कठीण झाले आहे. औद्योगिक विकास मंडळाने परिसरातील रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. फेज-2 मधील एका सेवा रस्त्यावर या गुलाबी रंगाच्या रसायनाचा थर पसरला आहे.

यापूर्वीही अशाच प्रकारचे रसायन रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले असल्याची आठवण रहिवाशांनी करून दिली. औद्योगिक महामंडळाचे दुर्लक्ष, कारखानदारांची बेफिकिरी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कोणताही अंकुश नसल्याने डोंबिवली औद्योगिक परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना वारंवार अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

road turned pink due to massive pollution in dombivali industrial area  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case: सिया गोयलच्या वकीलपत्रासाठी दोन वकिलांमध्ये पेटला वाद! अ‍ॅड. विपूल दुशिंग यांचं म्हणणं काय?

गरज पडल्यास ‘एन्काऊंटर’ही करणार; पदभार स्वीकारताच विश्वास नांगरे-पाटलांचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

IND vs IRE: भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर अश्विनचा संताप; थेट IPL वरच फोडलं खापर, म्हणाला...

१९ वर्षांचा झाला iPhone; सुरुवातीला नव्हते व्हिडिओ रेकॉर्डिंग ! जाणून घ्या Apple च्या पहिल्या स्मार्टफोनची गोष्ट...

Latest Marathi News Live Update: कोर्टाने नवीन उदाहरण समोर आणलं आहे- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT