वडखळ मार्गावर धूळीचे साम्राज्य  
मुंबई

म्हणून वडखळचा प्रवास नको म्हणतात 

प्रमाेद जाधव

अलिबाग : मोठमोठे खड्डे, वाहतूक कोंडी, वाहनांचा धूर, धूळ अशा दगदगीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील पेण-वडखळ दरम्यानचा प्रवास जीवघेणा होत आहे. अवघ्या सहा किलोमीटरच्या अंतरासाठी कधी कधी तब्बल तासभर वेळ लागतो. महामार्गाच्या रुंदीकरणाला सुरुवात झाल्यापासूनचे हे शुष्ककाष्ठ अजूनही संपलेले नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या विरोधात प्रचंड संताप आहे. 

पेण-वडखळ हा मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात अधिक वर्दळीचा पट्टा आहे. कोकणात जाणारे प्रवासी आणि पर्यटकांमुळे ही वर्दळ आहे. शनिवार, रविवार आणि अन्य सुट्टीच्या दिवसांत तर कधी कधी विक्रमी वर्दळ असते. प्रशासनाने याबाबत लक्ष देऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वडखळ नाक्‍यावरच वाहतूक पोलिस तैनात केले आहेत; परंतु त्याचाही फारसा उपयोग होत नाही. 

मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणानुसार पेण-वडखळ दरम्यानचे कंत्राट काही वर्षांपूर्वी सुप्रीमो इन्फ्रा कंपनीला देण्यात आले होते. परंतु या कंपनीकडून काम वेळेत झाले नाही. त्यामुळे आता हे काम जे. एम. म्हात्रे इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले आहे. 
सध्या या टप्प्यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात दुरुस्ती म्हणून लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक खराब झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ तयार झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीही होते. या समस्यांमुळे अवघ्या सहा किलो मीटरचे हे अंतर पार करण्यासाठी कधी कधी तासभर वेळ लागतो. वाहनांच्या धुरामुळे हा परिसर जणू "गॅस चेंबर' होतो. 
............ 
पर्यटनावर परिणाम 
मुंबई-गोवा महामार्गावर पेण-वडखळ यादरम्यान असलेल्या समस्यांमुळे प्रवशांचे आरोग्य धोक्‍यात येते. त्याचा फटका स्थानिक व्यावसायिकांनाही बसू लागला आहे. खड्डे आणि धूळमिश्रित रस्त्यांमुळे या मार्गावरून प्रवास नकोसा होतो. पर्यटकांनीही या समस्येमुळे कोकणातील पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवली आहे. हॉटेल आणि व्यावसायिकांनी त्याला दुजोरा दिला. सध्या त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील वाँटेड आरोपी विरेंदर बसोयाला पुण्यात आणणार

SCROLL FOR NEXT