रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांची लूटमार; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 
मुंबई

रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांची लूटमार; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : खासगी रुग्णालये आणि रुग्णवाहिका मालकांकडून रुग्णांची लूटमार सुरूच आहे. वरळी कोळीवाडा ते पवई आणि तेथून भायखळा अशा प्रवासासाठी तब्बल 24 हजार रुपये एका रुग्णाला भरावे लागल्याचे समोर आले आहे.

वरळी येथील ई मोझेस मार्गावर राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये कोव्हिडसदृश लक्षणे दिसू लागल्यावर त्यांच्या मुलाने महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्यामुळे या दोघांना वरळी येथून रुग्णवाहिकेने पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे खाटा नसल्यामुळे हे दोघे भायखळा येथील मसीना रुग्णालयात आले. या प्रवासासाठी रुग्णवाहिकेचा खर्च म्हणून 24 हजार रुपये वसूल करण्यात आले, असे समजते. या दाम्पत्याची मसीना रुग्णालयात कोरोना चाचणी केली असता, पतीचा अहवाल निगेटिव्ह आणि पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

शनिवारी या दोघांचे अहवाल आल्यानंतर त्यांनी पुन्हा महापालिकेला माहिती देऊन मुलाची कोरोना चाचणी करण्याची विनंती केली. त्यांच्या मुलामध्ये तेव्हा कोरोनासदृश लक्षणे नसल्याने महापालिकेने चाचणी केली नाही. त्याला घरात एकांतात राहाण्याची सूचना करण्यात आली. आता या मुलामध्ये फ्लूसदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोनाच्या रुग्णांकडून उपचारांचा खर्च आणि रुग्णवाहिकेचे भाडे म्हणून हजारो रुपये उकळले जात आहेत. नामांकित रुग्णालयांमध्ये एक दिवसाच्या उपचारांसाठी लाखो रुपये वसूल करण्यात आल्याचा प्रकारही घडला आहे. त्यानंतर राज्य सरकारने उपचारांचे दर ठरवले; मात्र लूटमार थांबलेली नाही. 

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
खासगी रुग्णवाहिकांचे मालकही कोरोनाच्या रुग्णांची पिळवणूक करत आहेत. त्यांच्यावर महापालिका आणि  राज्य सरकारचा अंकुश नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur cooperative elections : गोकुळ दूध संघासह कोल्हापूर जिल्ह्यातील ५१६ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार

Mumbai News: मुंबईतील राणीच्या बागेत गुजरातच्या सिंहाची गर्जना होणार; कधी? महत्त्वाची माहिती समोर

TRP पडला अन् 'ठरलं तर मग'मध्ये मोठी उलथापालथ; मालिकेत आणला सगळ्यात मोठा ट्विस्ट, प्रोमो व्हायरल

Japanese Beauty Secrets: वय वाढलं तरी त्वचा टवटवीत? जपानी महिलांच्या 5 ब्युटी सिक्रेट्स नक्की करा ट्राय

सासऱ्यांनी प्रॉपर्टीमधून बेदखल केलं, नणंदांनी केली कोर्ट केस ! मराठी अभिनेत्रीच्या आयुष्यात झालेली उलथापालथ

SCROLL FOR NEXT