...अन्यथा मंगळवारी मंत्रालयावर मोर्चा; मराठा महासंघाचा राज्य सरकारचा इशारा 
मुंबई

...अन्यथा मंत्रालयावर मोर्चा; मराठा महासंघाचा राज्य सरकारचा इशारा

कृष्ण जोशी

मुंबई : रोहा तालुक्यातील तांबडी गावातील (जि. रायगड) अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचे प्रकरण सरकारने गंभीरपणे हाताळले नाहीत, तर येत्या मंगळवारी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने दिला आहे.

     
महासंघाचे संयुक्त सरचिटणीस दिलीपदादा जगताप यांनी एका पत्रकाद्वारे हा इशारा दिला आहे. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना त्वरेने फाशी देण्यास विलंब झाल्याने राज्यभर अशा घटना वारंवार होत आहेत. जुलै महिन्यात रोहा तालुक्यातील तांबडी येथेही एका शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. 

कोकणात अशा प्रकारचे क्रूरकृत्य कधीही झाले नसल्याने हे षडयंत्र आहे का, याचा तपास करण्याची गरज आहे. सरकारी अनास्था आणि दफ्तरदिरंगाईमुळे अशी कृत्ये पुन्हा करण्याची हिंमत समाजकंटकांना होते. त्यामुळे तांबडी प्रकरण त्वरेने न्यायालयात चालावे यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घ्यावी, अन्यथा मंत्रालयावर मंगळवारी ( 18 ऑगस्ट ) रोजी मोर्चा काढला जाईल, असा इशारा जगताप तसेच संघटनेचे नगर चे पदाधिकारी संभाजीराव दहातोंडे यांनी दिला आहे.
---------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT