मुंबई

कॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्या कन्या रोझा देशपाडे यांचे मुंबईत निधन

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या माजी खासदार कॉम्रेड रोझा देशपाडे यांचे शनिवारी (ता.19) दुपारी 12. 30 वाजता दादर येथील घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी झाल्याने आणि फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांना दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.  गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर शनिवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
1974 साली त्या सीपीआयच्या तिकिटावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक जिंकल्या होत्या. गिरणी कामगारांच्या आंदोलनात त्या अग्रभागी राहिल्या. त्या प्रभावी वक्त्या होत्या. कॉ. डांगे यांच्या प्रमाणेच छोटी वाक्ये पण राजकीय प्रभावी विचार यांनी त्या हजारोंच्या सभा मुग्ध करत असत. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्या अग्रभागी होत्या. गिरणी कामगारांबरोबरच फार्मासिटीकल कामगार हे त्यांचे क्षेत्र होते.जॉन्सन ॲन्ड जॉन्सन सारख्या अनेक फार्मासिटिकल कंपन्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली युनियन होत्या.त्याकाळी फार्मासिटीकल कंपन्यांमध्ये महिला मोठ्या संखेने होत्या. गर्भवतींना कामावरून काढून टाकत असत.त्यांनी या विरोधात लढा देऊन ही मालकांची अरेरावी बंद पाडली.

भाकपतर्फे श्रद्धांजली
 भारतीय कम्युनिस्ट पक्ष रोझा देशपांडे यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी कॉ. प्रकाश रेड्डी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे. वृद्धकाळातही त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती. अनेक व्याख्यानाला त्या जात असत. विसाव्या शतकातील लढवय्यांची पिढीच्या त्या प्रतिनिधी होत्या.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT