मुंबई

पता नहीं जी कौनसा नशा करता हैं, दहिसर रेल्वे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या मूर्खाचा बाजार

सुमित बागुल

मुंबई : या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सुशिक्षित मूर्खांचा बाजार काय असतो हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. घटना आहे दहिसर रेल्वे स्टेशनवरील. रेल्वेकडून वारंवार सांगितलं जातं, रेल्वे रूळ ओलांडू नका, रेल्वे रुळावरून चालू नका, रेल्वे फलाटावर येत असताना रूळ आणि फलाटापासून दूर उभे राहा, ट्रेनमधून प्रवास करत असताना दरवाजात लटकू नका, रेल्वेमधून स्टंट्स करू नका.  मात्र या सगळ्या उद्घोषणा वारंवार करून, रेल्वे प्रवाशांना वारंवार सांगून, सुरक्षा सप्ताह वगैरे घेऊन प्रवाशांच्या डोक्यात काहीही प्रकाश पडत नाही. पालथ्या घड्यावर पाणी. याचीच प्रचिती मुंबईतील दहिसर स्थानकात पुन्हा एकदा पाहायला मिळाली.    

दहिसरमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना एक प्रवासी लोकलखाली येता येता वाचला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना स्टेशनवरील CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सामोरं ट्रेन येतेय हि दिसत असताना हा प्रवासी रेल्वे रुळ ओलांडत होता. रेल्वे रुळ ओलांडत असताना त्याच्या पायातून बूट निसटला. हा बुट घेण्यासाठी हा सदर माणूस पुन्हा मागे फिरला. अशात समोरुन एक लोकल ट्रेन धडधडत येतच होती. मात्र तरीही हलगर्जीपणा करत या प्रवाशाने आपला निसटलेला बूट पुन्हा घालत रेल्वे रुळ ओलांडण्याचा मूर्खपणा केला. इतक्यात तिथे कर्तव्यावर असल्याने पोलिसाने या प्रवाशाला प्लॅटफॉर्मवर ओढत त्याचे प्राण वाचवले. यावेळी जराही उशीर झाला असता तर त्याच उपस्थित पोलिसाला या माणसाचा मृतदेह उचलण्याची वेळ आली असती आणि मोठा अनर्थ घडला असता.

कोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा नाहीये. अशात लोकलमध्ये आणि फलाटांवर आधीएवढी गर्दी देखील होत नाही. तरीही काही नागरिक आपल्या घाईगडबडीमुळे नियम धाब्यावर बसवतातच. अशाच प्रकारच्या एका महाभागाने रुळ ओलांडण्याचा मूर्खपणा केला आणि स्वतःचा जीव धोक्यात घातला. अशा लोकांकडे पाहून तुम्हाला ते नुकतंच व्हायरल झालेलं "पता नहीं जी कौनसा नशा करता हैं" हे गाणं नक्की आठवेल. 

RPF police present on the staion saved man crossing track while train approaching

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT