मुंबई

तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर आरपीएफ पथकाची कारवाई; विविध तीन ठिकाणी मारली धाड

प्रशांत कांबळे

मुंबई  :  प्रवाशांना आरक्षित तिकिटे उपलब्ध करुन देण्याच्या सांगून तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या भामट्यांवर गेल्या तीन दिवसात तीन ठिकाणी आरपीएफ पथकाने कारवाई केली आहे. यामध्ये कळंबोली, माझगाव, वाशी या ठिकाणी धाड टाकून मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात आरपीएफ पथकाला यश आले आहे.

कळंबोली येथील सेक्टर एक मधील निवासस्थानावर छापा टाकला असता, मोबाइलवरून तत्काल ई-तिकिट आरक्षित राखून ठेवण्यात गुंतलेल्या राज मोहम्मद नसीम खान याला पकडण्यात आले आहे. दरम्यान आरपीएफ पथकाने अधिक चौकशी केल्यानंतर सुमारे 200 रुपये पर्यंतचे कमिशन घेऊन अनेकांना वैयक्तिक आयडीवरून ई तिकीट बुकिंग केल्याचे उघड झाले आहे. त्याशिवाय एक्सटेंशन सॉफ्टवेयरसह तत्काल तिकिट कसे बुक करायचे ? याबद्दल यूट्यूब वरून प्रशिक्षण घेऊन राजू मोहम्मद तिकिटाचा काळाबाजार करत असल्याचे स्पष्ट झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याप्रमाणेच सीएसएमटीच्या आरपीएफ पथकाचा समावेश असलेल्या दक्षता पथकाने माझगाव येथे संयुक्त छापा टाकून शमीम शेख (वय 49) याला अटक केली आहे. तर  मानखुर्द येथील आरपीएफ पथकाने वाशी रेल्वे स्थानकावर गुप्त देखरेखीत संशयित आरोपी म्हणून पकडलेल्या शेखर नाईकवर सुद्धा गुन्हा दाखल करून, मुद्देमालासह आरोपींना अटक केली आहे.

RPF squad cracks down on ticket blackmailers in mumbai  

--------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price fall before Dhanteras Diwali : धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी स्वस्त! एकाच झटक्यात दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे भाव..!

फटाके बनवताना भीषण स्फोट! ७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Maharashtra weather cyclone update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस खोडा घालणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!

Data Security : डेटा सुरक्षेत हलगर्जी भोवणार; आस्थापनांवर दंडाची टांगती तलवार; सहकारी बॅंका आणि पतसंस्थांनाही नियमावली लागू

SCROLL FOR NEXT