मुंबई

'इ-चलान'वरील दंड दंड भरा, नाहीतर ड्रायव्हिंग लायसन्स होईल रद्द! पोलिसांनी हाती घेतली विषेश मोहीम

सुमित बागुल

मुंबई : मुंबईतील ट्राफिक पोलिसांनी रस्त्यावर बेदरकारपणे गाड्या चालवणाऱ्या नागरिकांची एक यादी तयार केली आहे. या यादीनंतर आता मुंबईतील ट्राफिक पोलिस या 'रॅश' ड्रॉयव्हर्सकडून त्यांच्या 'इ-चलान'वर साठलेला दंड वसूल करणार आहेत.

मुंबईतील मारुती अर्टिगा आणि ह्युंदाई व्हर्ना या दोन गाड्यांच्या मालकांच्या नावावर सर्वाधिक 'इ-चलान' आहेत. तब्बल १५० 'इ-चलान' आणि एक लाख ५२ हजारांचा दंड तर ११० चलान आणि एक लाख १० हजार रुपयांचा दंड या गाड्यांच्या मालकांच्या नावावर साठलाआहे. मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर बेदरकारपणे गाडी चालवणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. या वाहन चालकांच्या नावावर ७० ते १५० 'इ-चलान' कापले गेलेत. 

तर तिसऱ्या स्थानावर मालाडच्या एका होंडा सिटी गाडीचा मालक आहे. या व्यक्तीच्या नावे तब्बल ८० हजार रुपयांचे चलान थकीत आहे. तर चौथ्या आणि पाचव्या जागेवर कांदिवलीमधील रेनो डस्टर आणि होंडा जॅझ या गाड्यांचे मालक आहेत. यांच्या नावावर अनुक्रमे ७२ हजार आणि ७१ हजारांचा दंड  थकीत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार यातील सर्वाधिक दंड हा 'ओव्हर स्पिडिंग' च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणीचा आहे. नो पार्किंगमध्ये अवैधरित्या गाडी पार्क करणे किंवा लेन कटिंग यासारख्या गुन्ह्यांचं प्रमाण तुलनेने कमी असल्याचं पोलिस म्हणालेत.    

महत्त्वाची बातमी 'राज्यपाल नियुक्त आमदारांची नावं जाहीर होण्याआधीच विरोध करणे चूक'; ठाकरे सरकारचा उच्च न्यायालयात दावा
   
ट्राफिक पोलिसांमधील सूत्रांच्या हवाल्याने असं समजतंय की, पोलिसांसाठी सदर दंड वसूल करणे हे काम अत्यंत जिकीरीचं असणार आहे. काही केसेसमध्ये RTO चा दंड हा जवळजवळ त्यांच्या वाहनाच्या किमतीएवढा झालाय. अनेकदा गाड्या एका वाहन मालकाकडून दुसऱ्याला,  दुसऱ्याकडून तिसऱ्याला विकल्या जातात. मात्र वाहन मालक स्वतःच्या नावावर गाडी करून घेत नाहीत. त्यामुळे गाडीच्या जुन्या मालकांकडून दंड वसूल करण्यास जावं लागणार असल्याचं RTO सूत्रांनी सांगितलं आहे. RTO कडे एकूण ३१७ कोटी रुपयांचा 'इ-चलान'वरील दंड येणं बाकी आहे. 

ट्रॅफिकचे जॉईंट कमिशनर ऑफ पोलिस यशस्वी यादव यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. ज्यामध्ये यशस्वी यादव म्हणालेत की, "आम्ही 'इ-चलान' असणाऱ्या ५० हजार वाहन चालकांशी आमच्या कंट्रोल रूममधून संपर्क साधणार आहोत. जर सदर वाहन मालकांनी आपल्या 'इ-चलान' वरील दंड भरला नाही तर अशा वाहन चालकांचे लायसन्स रद्द करण्यात येणार आहे.   

RTO your license will be cancelled if you fail to pay penalties on e challan

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT