मुंबई

'सामान्य माणसासाठी नियम पण शिवसैनिकांसाठी नाही?'

काँग्रेस आमदाराचा सवाल

दीनानाथ परब

मुंबई: वांद्रयामध्ये आज शिवसेनेने एका लसीकरण केंद्राचे (Vaccination center) उद्घाटन केले. यावेळी शिवसैनिकांनी लसीकरण केंद्रावर एकच गर्दी केली होती. त्यावरुन वांद्रयाचे शिवसेना आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी सेनेवर सडकून टीका केली आहे. "महाराष्ट्रात लॉकडाउन आहे. सर्वत्र कलम १४४ लागू आहे. (Rules only for common man and not for Shiv Sena? Zeeshan Siddique)

पण शिवसेनेचे नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते लसीकरण केंद्राच्या उद्घाटनासाठी गर्दी करतात. नियम हे फक्त सामान्य माणसासाठी आहेत, शिवसेनेसाठी नाहीत का? एक माणूस लस घेणार आणि बाकीचे फोटो काढण्यासाठी गर्दी करणार" अशी टीका झीशान सिद्दीकी यांनी केली.

त्यांनी आपले टि्वट सीएमओ महाराष्ट्र, आदित्य ठाकरे आणि महापालिकेला टॅग केले आहे. "शिवसेना उत्सव असल्यासारखे लसीकरण केंद्राचे उद्गघाटन करतेय. लसींपेक्षा पोस्टर्स जास्त आहेत. शिवसेनेने स्वत:च्या पक्ष निधीमधुन या लसी विकत घेतल्या आहेत का? महाविकास आघाडीचा उल्लेख मला कुठेही दिसला नाही. अशा प्रकारचा देखावा बंद करा, हे आपले कर्तव्य आहे" अशी टीका झीशान सिद्दीकी यांनी केली.

याआधी सुद्धा विभागातील लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचे निमंत्रण न मिळाल्याने झीशान सिद्दीकी यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेना उमेदवाराचा पराभव करुन विजयी झाल्याबद्दल विभागात होणाऱ्या सर्व सरकारी कामांपासून दुर ठेवले जाते असा आरोपच काँग्रेसने केला होता.

शिवसेनेचे माजी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचा पराभव करुन आपण विजयी झालो आहोत. त्यामुळेच या मतदार संघात होणाऱ्या कार्यक्रमांचे निमंत्रण दिले जात नाही. ही पहिलीच वेळ नसून अनेक वेळा असे प्रकार झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT