Jitendra Awhad 
मुंबई

'जागा भरण्यासाठी पैसे घेतल्याच्या अफवा'; जितेंद्र आव्हाड म्हाडाच्या परीक्षेबाबत सतर्क

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आरोग्य भरतीच्या पेपर फुटीनंतर गृहनिर्माण विभागाच्या परिक्षेबाबत सरकार सतर्क झालं आहे. म्हाडाची (MHADA) परीक्षा 12 डिसेंम्बर रोजी होणार आहे. या बाबत महाराष्ट्रात अफवा पसरवल्या जात आहेत. या म्हाडाच्या जागा भरण्यासाठी पैसे घेतल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हटलंय. याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलंय की, या अफवांना बळी पडू नका. म्हाडाच्या या परीक्षा (MHADA exams) पारदर्शक पद्धतीने होणार आहेत. ज्यांनी कोणी पैसे घेतलेत, त्यावर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

बारा तारखेला होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. काही लोक पैसे देखील घेत असल्याचं माझ्या कानावर आलंय. अशांना कुणी जर रंगेहात पकडून दिलं तर त्यांच्यावर पोलिसांकरवी कडक कारवाई केली जाईल. कृपया विद्यार्थ्यांनो, कुणालाही पैसे देऊ नका. ही परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे होणार आहे. पास झालेल्यांची दुसरी परीक्षाही घेतली जाणार आहे. ती पूर्ण लेखी परीक्षा असणार आहेत. त्यामुळे तुमचे असे पैसे वाया जातील. असा कुणी माणूस पैसे घेताना आढळला तर त्यांच्याबाबत कळवा. फसवणुकीला बळी पडू नका. यांच्यावर आम्ही कारवाई करु. पारदर्शकपणेच या परीक्षा पार पडतील.

आरोग्य भरती परीक्षा घोटाळा

काही दिवसांपूर्वीच झालेल्या आरोग्यभरतीच्या परीक्षेमध्ये मोठा घोटाळा आणि गोंधळ पहायला मिळाला होता. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळण्यापासून ते परीक्षा केंद्रांमध्येही गोंधळ पहायला मिळाला. ही परीक्षा घेणाऱ्या 'न्यासा' कंपनीवर देखील अनेक प्रश्न उठवण्यात आले. सध्या या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या परीक्षेबाबत असे गोंधळ होऊ नयेत, यासाठी सरकार काळजी घेताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT