Mumbai Russian YouTubers
Mumbai Russian YouTubers  
मुंबई

Russian YouTubers: बापरे! 60 मजली टॉवरवर जीवघेणी स्टंटबाजी; दोन रशियनं युट्यूबर्सना अटक

सकाळ डिजिटल टीम

मुंबईत लोकल ट्रेन्स असतील किंवा उंच इमारतींवर जीवघेणी स्टंटबाजी करणारे अनेक जण आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी वेळोवेळी कारवाया देखील केल्या आहेत. त्यानंतर आता रशियाचे नागरिक असलेल्या दोन युट्यूबर्सना अशा प्रकारचे स्टंट करताना आणि त्याचा व्हिडिओ बनवताना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या ताडदेव भागात ही कारवाई करण्यात आली. (Russian YouTubers arrested for shooting video inside Imperial Twin Towers in Mumbai)

पोलिसांच्या माहितीनुसार, रोमन प्रोशिन (वय ३३) आणि मक्सिम शेरबाकोव्ह (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्या दोन रशियन नागरिकांची नावं आहेत. ताडदेव भागातील इम्पीरियल ट्वीन टॉवर्सवर या दोघांनी जीवघेणे स्टंट केले होते, याचा व्हिडिओही त्यांनी बनवला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांवर कारवाई केली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

भादंवि कलम ४५२ (परवानगीशिवाय इमारतीत घुसणे) आणि कलम ३४ (संघटित गुन्हेगारी) या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी रशियाच्या दुतावासाला याबाबत माहिती दिली आहे. पोलीस चौकशीदरम्यान या युट्युबर्सनं पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. हे दोघेही पायऱ्यांच्या सहाय्यानं तब्बल ५८ मजले पायी चढून गेले. त्यानंतर त्यांनी जीवघेणे स्टंट असलेला व्हिडिओ शूट केला. यानंतर आणखी एक व्हिडिओ शूट करण्याचा त्यांचा विचार होता.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

अब्जाधीसांची ६० मजली वसाहत

इम्पीरियल ट्वीन टॉवर्स हे मुंबईतील अब्जाधीशांची वसाहत आहे. हे टॉवर्स म्हणजे आधुनिक शैलीतील बांधकाम असलेलं ६० मजली गगनचुंबी निवासी संकुल आहे. या टॉवर्समध्ये फक्त अतिश्रीमंत अब्जाधीश लोकचं राहतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

SCROLL FOR NEXT