Uddhav-Thackeray 
मुंबई

"आता तरी वाझे दोषी असल्याचं कबूल कराल का?"; मुख्यमंत्र्यांना प्रश्न

सकाळ डिजिटल टीम

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री एनआयएने अटक केली. अंबानी यांच्या बंगल्यासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ती स्फोटकांनी भरलेली कार अंबानींच्या निवासस्थानाबाहेर ठेवण्याच्या कटात वाझे सामील असल्याचा ठपका ठेवत त्यांनी अटक करण्यात आली. या प्रकरणावर रविवारी सकाळपासूनच सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया आल्या. भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सचिन वाझे प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. तसेच, ठाकरे सरकारला काही सवालही केले.

"भाजप पक्ष या प्रकरणात पहिल्या दिवसापासून आक्रमक आहे. हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर हिरेन यांच्या हत्येचा आरोप केल्यानंतर वाझेंचे निलंबन करून त्यांना अटक करावी अशी आमची मागणी होती. आता कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांची चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली. पण आता प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे हा ओसामा बिन लादेन आहे का असा सवाल विरोधकांना केला होता. वाझे लादेन आहे असं आम्हाला म्हणायचं नाही पण किमान तो आरोपी आहे एवढं तर आता तुम्ही कबूल कराल की नाही", असा प्रश्न विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. तसेच, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन वाझेंची पाठराखण केली. त्यानंतर दरेकर यांनी खोचक ट्वीट केलं.

"सचिन वाझे नेमका कोण आहे? यावर आता भाष्य होण्याची आवश्यकता आहे. कारण या विषयावर मुख्यमंत्री किंवा सरकारची भूमिका आली नाही तर आणखी संशय वाढेल. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे वाझेच्या निलंबनाची कारवाई करून सरकारचं त्यांना समर्थन नाही हे दाखवण्याची संधी आहे. विरोधी पक्षाकडे जेव्हा पुरावे जातात, तेव्हा जनतेच्या मनात सरकारची विश्वासार्हता कमी होते. तुम्हाला दस्तावेज मिळत नाहीत हे तुमचं अपयश आहे. कारण तुमच्याकडे यंत्रणा असूनही तुम्ही काही करत नाही", असा टोला दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

"जनता विरोधी पक्षाकडे पुरव्यासहित येत आहे. त्यात संजय राऊत वाझे प्रकरणावर पत्रकार परिषद घेत आहेत. या सगळ्या गोष्टींचा अर्थ कसा काढायचा?", असा सवालही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT