मुंबई

Sachin Waze Case: पोलिस अधिकारी रियाझ काझी निलंबित

पूजा विचारे

मुंबई:  सचिन वाझेचे सहकारी पोलिस अधिकारी रियाझ काझी याला रविवारी NIAने अटक केली.  दरम्यान आज रियाझ काझीला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. ॲंटिलीया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणात काझीचा सहभाग आढळून आला होता.  या प्रकरणात काझीला NIA नं अटक केल्यानंतर काझी वर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. काझी सध्या सशस्त्र पोलिस दलात कार्यरत होता. या गुन्ह्यादरम्यान वाझेसोबत तो तपास अधिकारी म्हणून काम करत होता.  काझीवर या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी सर्वप्रथम सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर NIAने पोलीस अधिकारी रियाझ काझीला अनेकदा चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तशातच स्फोटकांच्या कटात सामील असणे आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणे या आरोपांखाली सचिन वाझेचा सहकारी रियाज काझीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या कटामध्ये रियाझ काझीही सामील होता अशी शंका NIA ला सुरूवातीपासूनच होती. म्हणूनच सचिन वाझेला ताब्यात घेतल्यानंतर काही दिवसांतच रियाझ काझीला चौकशीसाठी बोलवलं गेलं. त्याची वारंवार चौकशी करण्यात येत होती. CIU चे प्रमुखपद वाझेकडे होते आणि रियाझ हा देखील CIUचा अधिकारी असल्याने त्याच्यावर NIAला संशय असल्याचं समजलं होतं. अखेर रविवारी NIAने रियाझ काझीला कटात सहभागी असणे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि मदत केल्याप्रकरणी अटक केली.

कोण आहे  रियाझुद्दीन काझी 

API रियाझुद्दीन काझी 102 बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. 2010 मध्ये त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांची पोलीस भरती झाली. त्यांचे पहिले पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये PSIच्या पोस्टवर झालं होतं. तेथे त्यांनी प्रोबेशन पीरियडवर काम केले. वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये काही वर्षे काम केल्यावर त्यांची अँटी चेन-स्नॅचिंग स्कॉडमध्ये बदली करण्यात आली. त्यानंतर रियाझुद्दीन यांची थेट CIU मध्ये बदली झाली. अँटिलिया स्फोटक प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा संशय बळावताच त्यांची बदली LA मध्ये करण्यात आली.

Sachin Waze Case API suspended riyaz kazi from service

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT