sachin-vaze 
मुंबई

"सचिन वाझेची चौकशी करा पण..."; न्यायालयाचे CBIला निर्देश

सकाळ डिजिटल टीम

मुंबई, ता. 7 : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या वसुली आरोपांबाबत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेची चौकशी करण्याची परवानगी विशेष एनआयए न्यायालयाने आज सीबीआयला दिली. वाझेचा ताबा मिळण्यासाठी सीबीआयने न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायमूर्ती पी आर सिंत्रे यांच्यापुढे आज रिमांडसाठी वाझेसह आरोपी विनायक शिंदे आणि बुकि नरेश गोर यांना हजर करण्यात आले. न्यायालयाने वाझेचा रिमांड 9 एप्रिलपर्यंत वाढवला तर अन्य दोघांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. एनआयए कोठडीतच सीबीआयने वाझेची चौकशी करावी पण चौकशीच्या वेळेचे नियोजन एनआयएशी चर्चा करून करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले.

विनायक शिंदेच्या वतीने त्यांना स्वतंत्र कारागृहात ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ही मागणी न्यायालयाने अमान्य केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पियो गाडी आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणात पोलिसांनी वाझेला अटक केली आहे. तर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले गेले आहेत. या आरोपांवर तपास करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

महाराष्ट्रात नवा 'लेटरबॉम्ब'

सचिन वाझेने NIAला आज एक पत्र लिहिलं. त्यात त्याने राज्याचे मावळते गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय घोडावत यांच्यावर आरोप केले. त्यापैकी परब यांच्यावर SBUT च्या ट्रस्टींकडून चौकशी थांबवण्यासाठी ५० कोटी रुपये मागितल्याचा आणि मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी करण्याचा आरोप आरोप सचिन वाझेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, अनिल परब यांनी हे आरोप फेटाळत नार्कोटेस्टला सामोरं जाण्यासही तयार असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT