मुंबई

सचिन वाझे यांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट, उद्या बाजू मांडण्याची शक्यता

अनिश पाटील

मुंबई: पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी दिवसभरात मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची तीनदा भेट घेतली. मुंबई पोलिस मुख्यालयात ही भेट झाली. या भेटीदरम्यान सहपोलिस आयुक्त मिलिंद भांरभे हे देखील उपस्थित होते असे समजतेय. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

तत्पूर्वी विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वाझे यांची मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेबाहेर बदली करण्याचा निर्णय सरकारने घोषित केला. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद हत्येप्रकरणी वाझे यांच्यावर कारवाई करण्याचा मुद्दा भाजपने गेल्या दोन दिवसांपासून लावून धरला होता. मनसुख हिरेन यांच्या पत्नीनेही वाझे याच्यावर गंभीर आरोप केले आहे.

दुपारी एकच्या दरम्यान पहिली भेट झाली. या भेटीनंतर माध्यंमापुढे वाझे यांनी गुरुवारी त्यांची बाजू मांडणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दुपारी साडेचार आणि संध्याकाळी वाझे- आयुक्ताची भेट झाल्याचे वृत्त आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरापुढे जिलेटीन भरलेली गाडी मनसुख हिरेन यांची होती. या घटनेनंतर अचानक हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत संशयास्पद अवस्थेत सापडला होता. सध्या या प्रकरणाचा तपास एनआयएने आपल्या ताब्यात घेतला आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Sachin Waze meets Commissioner of Police will present his case tomorrow

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लक्ष्मण बांदल; शशिकांत शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Bangladesh Onion Export : कांद्याच्या बाजारात नवा खेळाडू, श्रीलंकेसाठी बांगलादेशाची निर्यात तयारी; भारतीय कांद्यासमोर नवे आव्हान

SCROLL FOR NEXT