Sadabhau Khot, Devendra Fadnavis
Sadabhau Khot, Devendra Fadnavis Esakal
मुंबई

भाजप सहा जागा लढवण्यावर ठाम, सदाभाऊ पोहोचले फडणवीसांच्या भेटीला

सकाळ डिजिटल टीम

राज्यसभा निवडणुकांचा गुलाल उधळल्यानंतर येत्या २० जुलैला महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत. महाविकास आघाडीला यावेळी बॅकफूटवर जावं लागलं. धनंजय महाडिकांच्या विजयाने भाजपचं पारडं जड झालंय.

गुप्त मतदान असल्याने भाजपला मतं पडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे भाजपने पाच जागांसाठी सहा उमेदवरा रिंगणात उतरवले आहेत. भाजपच्या पाच जागा पक्ष लढवणार आहेच. मात्र सदाभाऊ खोत यांना अपक्ष म्हणून उतरवून भाजपने निवडणुकीला रंगत आणलीय. (Sadabhau Khot Meets Devendra Fadnavis over MLC Election 2022)

काँग्रेसकडून ही निवडणूक बिनविरोध कऱण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसने एक उमेदवार मागे घेतल्यास भाजपनेही उमेदवार मागे घ्यावा, अशी ऑफर असल्याची चर्चा आहे. मात्र असं झाल्यास सदाभाऊंना माघार घ्यावी लागणार, हे स्पष्ट झालंय. मात्र सध्या भाजप सहा जागांवर लढणार असल्याचं सदाभाऊंनी सांगितलं आहे. (Sadabhau Khot Latest News)

भाजपने सहाव्या जागेसाठी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत यांना मैदानात उतरवलं आहे. एका जागेसाठी 27 मतांचा कोटा आहे. भाजपचे संख्याबळ पाहता चार उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. पण त्यानंतरही भाजपने सहा उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आता अंतिम निर्णय फडणवीस घेतील, ते चाणाक्य आहेत, असं वक्तव्य सदाभाऊंनी केलं. (MLC Election 2022)

महाविकास आघाडीतर्फे देखील सहा उमेदवार रिंगणार आहेत. त्यामुळे एकूण दहा जागांसाठी १२ उमेदवारांमध्ये चुरस होणार आहे. सदाभाऊ खोत यांनी नुकतीच देवेंद्र फणवीस यांची भेट घेतली. आज अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख असल्याने दोघांमध्ये खलबतं झाली आहेत. यानंतर सहा जागा लढण्यावर भाजप ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास 15 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यानंतर फडणवीसांनी सदाभाऊंना काही काळ कार्यालयातच बसण्यास सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस हे आधुनिक युगातील चाणक्य असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले. कोरोना काळात पायाला भिंगरी लावून ते फिरले. प्रत्येक आमदाराला वाटतं कार्यक्षम मुख्यमंत्री मिळावा, असं वाटतं. त्यामुळे फडणवीसांनी पुन्हा राज्याची धुरा सांभाळावी अशी अपेक्षा सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे.

विधानपरिषदेसाठी १२ उमेदवार

शिवसेना

सचिन अहिर

आमश्या पाडवी

राष्ट्रवादी

रामराजे नाईक निंबाळकर

एकनाथ खडसे

काँग्रेस

भाई जगताप

चंद्रकांत हंडोरे

भाजप

प्रवीण दरेकर

उमा खापरे

श्रीकांत भारतीय

राम शिंदे

प्रसाद लाड

अपक्ष उमेदवारी (भाजपप्रणित)

सदाभाऊ खोत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT