मुंबई

भयानक : मुंबईतील सर्वात सेफ झोन होतोय डेंजर झोन...

सकाळवृत्तसेवा

मुंबई 4 : मुंबईतील सेफ झोन असलेल्या मुलुंडमध्ये एकाच दिवसात 55 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातही इंदिरा नगर या वस्तीत 36 रुग्ण आढळले आहेत. इंदिरा नगर हा झोपडपट्टीचा परीसर असून गेल्या तीन चार दिवसांपासून या परीसरात कोरोनाचे रुग्ण आढळत होते. त्यामुळे महापालिकेने या भागातील नागरीकांची युध्द पातळीवर तपासणी केली असता एका दिवसात 36 रुग्ण आढळले आहे. त्यामुळे महापालिकेने हा परीसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करुन सिल केला आहे. तसेच इतर नागरीकांचिही तपासणी सुरु केली आहे. इंदिरा नगर बरोबरच रामग्रह तसेच मुकूंद परीसरातून प्रत्येकी दहा रुग्ण आढळले आहेत. 

मुंबईत कोरोनाचा कहर सुरु असताना मुलूंड परीसर तुलनेने सुरक्षीत होता. 21 एप्रिल पर्यंत मुलूंडच्या टि प्रभागाच्या हद्दीत 23 रुग्ण आढळले होते. तर 3 मे पर्यंत हि संख्या 73 पर्यंत पोहचली होती. मात्र, आज अचानक 55 रुग्ण आढळल्याने ही संख्या 128 पर्यंत पोहचली आहे. 

झोपडपट्ट्यामध्ये कोरोनाचा रुग्ण पसरल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येतात. या दाटीवाटींच्या परीसरात समाजिक अंतर पाळणे हेच सर्वात मोठे आव्हान आहे. कोरोनाच्या प्रतिबंधाची पाहाणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने झोपडपट्ट्यांमधिल हायरिस्क व्यक्तिना पालिकेच्या इमारतींमध्ये क्वारंटाईन करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार या भागातील एक पालिका आणि एक खासगी शाळाही ताब्यात घेण्यात येणार आहे. 

safest corona zone in mumbai is now turning into danger zone read full news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT