Devendra Fadnavis  Team eSakal
मुंबई

Sakal Mahabrands 2023: गरीबी कशी दूर होईल? फडणवीसांनी पाच वाक्यात सांगितला उपाय

सकाळ माध्यम समुहाच्या ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र या कार्यक्रमात उद्योजकांना प्रोत्साहित करताना फडणवीस बोलत होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Sakal Mahabrands 2023 : देशातील गरीबी ही महत्वाची समस्या आहे. ही गरीबी दूर व्हावी म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या परीनं आश्वासनं देत असतात. पण ही समस्या दूर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ पाच वाक्यात गरीबी कशी दूर करता येईल याचा उपाय सांगितला आहे. सकाळ माध्यम समुहाच्या ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र या कार्यक्रमात उद्योजकांना प्रोत्साहित करताना फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले, गरीबी जर दूर करायची असेल तर संपत्ती निर्माण झाल्याशिवाय गरीबी दूर होऊ शकत नाही. त्यामुळं संपत्ती निर्मितीकडं सकारात्मक नजरेनं बघितलं पाहिजे. संपत्ती निर्मितीबरोबर संपत्तीचं वाटप हा ही महत्वाचा घटक असतो, तो निश्चितपणे घडत असतो. पण संपत्तीच निर्माण झाली नाहीतर तीच कधीच वाटप होऊ शकत नाही. (Latest Marathi News)

म्हणून जे संपत्ती निर्मिती करत आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन कसं देता येईल, याकडं आपण पाहिलं पाहिजे. संपत्ती कशी तयार करता येईल, त्यातून अधिकाधिक लोकांना रोजगार देणं तसेच त्यातून अधिकाधिक लोकांपर्यंत समृद्धी पोहोचणं अशा पद्धतीनं गरीबी दूर करण्यासाठी काम करता येईल, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधा महाराष्ट्रात तयार होत आहेत. आपण ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक पायाभूत सुविधांमध्ये करतो आहोत. महाराष्ट्रातील सध्या सुरु असलेल्या या प्रकल्पांमुळं गुंतवणूक वाढणार असून नव्या संधी निर्माण होणार आहेत, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

Cheese Omelette Paratha: ब्रेड-ऑम्लेटला द्या ब्रेक! रविवारी बनवा हा भन्नाट चिज ऑम्लेट पराठा

साप्ताहिक राशिभविष्य : (१२ जुलै २०२६ ते १८ जुलै २०२६)

SCROLL FOR NEXT