sakshi dabhekar
sakshi dabhekar sakal media
मुंबई

संस्काराच्या शिदोरीतील गुणदर्शन; ...पण चिमुकल्याला वाचवला!

निलेश मोरे

मुंबई : गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे (kokan flood) महाड पोलादपूर तालुक्यात दरड व पूरस्थितीने (mahad poladpur landslide) अनेकांचे हकनाक बळी घेतले. डोंगर खचून दरडीखाली वर्षानुवर्षे वसलेली गावे क्षणात होत्याची नव्हती झाली. महाड मधील तळीये (Taliye village) तर पोलादपूर मधील गोवेले सुतारवाडी व केवनाळे गावात दरडी कोसळून अनेकजण मृत्युमुखी तर काहीजण बेपत्ता झाले आहेत. सावित्रीच्या खोऱ्यात वसलेल्या केवनाळे गावात (kevnale village) झालेल्या मुसळधार पावसात दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला. तर या दरम्यान गावातील एका दीड वर्षाच्या मुलाला वाचवताना 14 वर्षीय मुलीला आपला डावा पाय गमवावा लागल्याने तिला मानसिक धक्का बसला आहे. साक्षी नारायण दाभेकर ( 14 ) (sakshi dabhekar) असे या चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या धाडसी मुलीचे नाव असून मुंबईतील केईएम रुग्णालयात (KEM hospital) तिच्यावर उपचार सुरू आहेत. ( Sakshi dabhekar saved a child from flood tragedy but lost her left leg- nss91)

पोलादपूर तालुक्यातील देवळे येथील नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय मध्ये ती इयत्ता नववीचे शिक्षण घेत असून खो खो , धावणी तसेच कबड्डी खेळात ही ती उत्तम खेळ खेळली आहे. शाळेत आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धात तिने सहभाग घेऊन प्राविण्य देखील मिळवले आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हापातळीवर खेळण्यासाठी तिची निवड झाली होती मात्र कोरोनामुळे साक्षीला आपले कौशल्य दाखवता आले नाही. साक्षीचे वडील नारायण दाभेकर यांना तीन मुली आहेत. महाबळेश्वर मेढा येथे छोट्याशा हॉटेल मध्ये काम करणाऱ्या नारायण दाभेकर याना कोरोना काळात काम गमवावे लागल्याने घरची परिस्थिती बिकट झाली आहे.

साक्षीची आई अधूनमधून आजारी पडत असल्याने तिच्या उपचारासाठी पैसे कमी पडत आहेत. नारायण दाभेकर इतरांच्या शेतावर मजुरी करून घरचा उदरनिर्वाह भागवतात. दोन महिन्यांच्या ( मीना कुमठेकर यांचा मुलगा ) मुलाला साक्षीने दरडीतून वाचवले मात्र स्वतःच्या पायावर दरड कोसळल्याने तिला डावा पाय गमवावा लागला आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या नवीन इमारतीत चौथा माळा , वार्ड नंबर 29 मध्ये ती उपचार घेत आहे. साक्षीच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून डावा पाय कापावा लागला आहे.

ज्या चिमुकल्याला ती नेहमी खांद्यावर घेऊन खेळवत असे त्याला वाचवल्याचा तिला आनंद आहेच मात्र भविष्यात चांगली खेळपट्टू बनण्याचं स्वप्न अर्धवट राहिल्याने तिला मानसिक धक्का बसला आहे. सध्या साक्षीला धीर देण्यासाठी अनेक कार्यकर्ते भेट देत आहेत. मात्र तिला सध्या गरज आहे आर्थिक मदतीची. अपंगावस्थेत ही साक्षीला मैदानात उतरून कौशल्य दाखवायच आहे. त्यासाठी तिने जिद्द पणाला लावली आहे. साक्षीला अपंगत्व आले असले तरी अभ्यासात देखील ती हुशार आहे. शासनाकडून साक्षीच्या धाडसीपणाच कौतुक व्हावं व तिला आर्थिक हातभार मिळावा तसेच समाजातील दानशुरानी देखील पुढे येऊन साक्षीला आर्थिक मदत करावी यासाठी बॅंक खाते क्रमांक देण्यात आला आहे.

प्रतीक्षा नारायण दाभेकर

बँक ऑफ इंडिया, पोलादपूर शाखा,

A/C No. 120310510002839

IFSC code - BKID 0001203

MICR - 402013520

संपर्क - 8291813078

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT